Tag: Google

गुगलवरच गुगली

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बदल ही नवीन गोष्ट नसली तरी तेसर्वांनाच पसंत पडतील याची खात्री मात्र कुणीच देऊ शकतनाही . अगदी बड्या कंपन्यांनाही त्यामुळे टीकेचा सामना करावा लागतो . सध्या गुगलवर ही वेळ आली असूनजीमेल , डूडल आणि प्रायव्हसी पॉलिसीवरुन गुगलला टीकेचा सामना करावा लागतो आहे . जीमेल मध्ये नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पूर्वी नवीन पेज दिसत होते . पण त्याऐवजी आता नवीन पॉप - अपविंडो ओपन होऊ लागली आहे . ऑक्टोबरपासून गुगल त्याची चाचपणी करत होते आणि पूर्वीच्या पेक्षा ही पद्धतअधिक वेगवान असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे . जीमेल युझर मात्र यावर खूश नाहीत . त्यांनी ट्विटरवरयाविषयी नापसंती व्यक्त केली असून इतर ईमेल सर्विसचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणेआहे . मात्र ज्या युझर्सला हा बदल आवडलेला नाही त्यांना जुन्या पद्धतीनेच ईमेल टाइप करण्याची सोय उपलब्धआहे . त्यासाठी कंपोझ बटनावर क्लिक केल्यावर नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पॉप अप विंडो ओपन होईल .त्या विंडोमध्ये उजव्या हाताच्या खालील भागात more options असा पर्याय उपलब्ध आहे . त्यावर क्लिककेल्यावर temporily switch back to old compose असा ऑप्शन उपलब्ध आहे . त्यावर क्लिक केल्यावरपूर्वीप्रमाणे नवीन मेल टाइप करण्यासाठी स्वतंत्र पेज ओपन होईल . इस्टरच्या डुडलवरून टीका सीझार चावेझ यांच्या जयंतीनिमित्त इस्टरच्या दिवशी गुगलने तयार केलेले डूडल अनेक अमेरिकन नागरिकांनापसंत पडले नाही . अमेरिकेतील नॅशनल फार्म वर्कर्स असोसिएशनचे सहसंस्थापक असलेल्या चावेझ यांचे १९९३मध्ये निधन झाले होते . गेल्यावर्षी ३१ मार्च हा दिवस ओबामा यांनी सीझार चावेझ डे म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे गुगलने रविवारी तयार केलेल्या डूडलमध्ये गुगल लोगोच्या मध्यभागी चावेझ यांचा चेहरा बसविण्यातआला होता . मात्र नेमका त्याच दिवशी इस्टर असल्याने इस्टरऐवजी चावेझ यांच्यावर डूडल तयार केल्याने अनेकनागरिक नाराज झाले . गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक स्मिड आणि ओबामा यांच्यातील घनिष्टसंबंधांमुळे हे डूडल तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली . प्रायव्हसीवरुन युरोपियन देशांचा रोष ब्रिटन , फ्रान्स , नेदरलँड , जर्मनी , स्पेन आणि इटली या सहा देशांनी मिळून गुगलच्या प्रायव्हसीपॉलिसीविरोधात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे . गेल्यावर्षी कंपनीने ६० स्वतंत्र प्रायव्हसीपॉलिसी एकत्र करून एक युनिव्हर्सल पॉलिसी तयार केली होती . मात्र त्यामुळे गुगलकडे ग्राहकांची काय माहितीआहे आणि ती कंपनीकडे किती काळ राहील हे त्यांना कळत नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे . माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांना मात्र कंपनीच्या सर्च इंजिनच्या यशस्वितेसाठी ही पॉलिसी गरजेची असल्याचे वाटते .

गुगलला ७० लाख डॉलरचा दंड

अमेरिकेत इंटरनेटच्या खासगी वाय - फायनेटवर्कमधून गुपचूपपणे , बेकायदेशीर माहिती गोळा केल्याप्रकरणी ७० लाख अमेरिकन डॉलर्स दंड भरण्याचीतयारी गुगलने दर्शवली . अमेरिकेतील ३८ राज्यांमध्ये अॅटर्नी जनरलसोबत हा करार केला .  माहितीची गोपनीयता राखण्याबाबत कर्मचाऱ्यांना कडक प्रशिक्षण देण्यास तसेच यूजर्सना वायरलेस नेटवर्कसुरक्षित करण्याविषयी जागरूक करण्याची मोहीम राबवण्यासही गुगलने मान्यता दिली . गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूइमेजसाठी पॅनोरमा फोटो काढणाऱ्या वाहनांनी वायफाय इंटरनेटच्या असुरक्षित नेटवर्कमधून बेकायदेशीररित्याडेटा गोळा केल्याच्या वृत्तानंतर सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती . गुगलनेस्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्याचे नऊ देशांमध्ये समोर आले , असे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हसी इन्फॉर्मेशन सेंटरनेस्पष्ट केले . स्ट्रीट व्ह्यू वाहनांनी अमेरिकेत २००८ ते २०१० या काळात गोळा केलेला ईमेल , पासवर्ड , वेबहिस्ट्री आणि अन्य डेटा नष्ट करण्याचे आश्वासनही गुगलने दिले . 

गूगलने लॉन्‍च केला बोलणारा, हसणारा तसेच रडणारा शूज

गूगलने लॉन्‍च केला बोलणारा, हसणारा तसेच रडणारा शूज

विकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून 'गुगल'ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्‍या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले ...

‘जी-मेल’ने केला प्रायव्हसीचा भंग? ‘ गुगल ‘ ची खेळी संशयास्पद.

यूजरने पाठविलेला (सेन्ट) किंवा स्वीकारलेला (इनबॉक्स) प्रत्येक मेल गुगलतर्फे वाचला जातो , असा खळबळजनक दावा सॉफ्टवेअरनिर्मात्या ' मायक्रोसॉफ्ट ' ने केला आहे.  ' डोंट गेट स्क्रूगल्ड बाय जी-मेल ' या ...

गुगलचे हँगआऊट जीमेलवर : मित्रांसोबत चॅट जीमेलचा नवा पर्याय

ग्रुप चॅट तेही व्हिडिओवर करण्याची धम्माल आता जीमेलवर उपलब्ध होणार आहे . गुगलने नुकतेच आपल्या ग्रुप व्हिडीओ चॅटिंगची हँगआऊट सेवा भारतीय युजर्ससाठी लाँच केली .यामध्ये आपण एकाच वेळी नऊ जणांशी बोलू शकणारआहोत .  ही सेवा वापरण्यासाठी युजर्सनी केवळ जीटॉकच्या पॅनेलशेजारी असलेल्या व्हिडीओ कॅमेरावर क्लिक करायचे आहे . यानंतर एक नवीन विंडो पॉप - अप होईल . यात गुगल प्लसमधील आपल्या मित्रांची यादी दिसणार आहे .यामध्ये आपण त्यांच्या जीमेल आयडीवर क्लिक करून त्यांना व्हिडीओ चॅटलिस्टमध्ये अॅड करू शकतो .                      गुगल प्लसमध्ये नसलेल्या एखाद्या मित्राशी आपल्याला चॅट करायचे असेल तर आपण जीमेल आयडीवरून त्यांना इन्व्हिटेशन पाठवू शकतो . हे चॅट आपण हँगआऊट या फिचरचा वापर करून सर्वांसाठी खुले करू शकतो . यासाठी युट्यूबचे अकाऊंट लागते . यानंतर ते चॅट ब्रॉडकास्ट होताना दिसेल . आपण त्या ग्रुपमध्ये करत असलेल्या विविध चर्चा आपल्या फोटोसह सर्वांना पाहवयास मिळणार आहेत . एकदा हँगआऊट सुरू झाले की , आपल्या ग्रुपमेंबर्सची यादी आपल्याला स्क्रीनच्या खालच्या बाजूस दिसते तर व्हिडीओ वरच्या बाजूस दिसतो . जीमेलच्या विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स , स्क्रीनशेअर , गुगल ड्राइव्ह , गुगल डॉक्स , इफेक्ट्स आणि पिंग पाँग हँगआऊट असे पर्याय दिसू लागतील . चॅट आणि हँगआऊटच्या माध्यमातून मित्रांना मेसेजेसही पाठवता येणार आहेत . तर स्क्रीनशेअर या सुविधेमध्ये मित्रांशी स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत . हे शेअर केल्यावर आपल्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सना तो व्हिडीओ पाहता येणार आहे . गुगल ड्राइव्ह आणि गुगल डॉक्स हे व्हिडीओ चॅट्समध्ये अधिक गंमत आणतील , असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे .  हँगआऊटमध्ये जाऊन मज्जा - मस्ती करायची असेल तर गुगलने हँगआऊटमध्ये गेम्सचीही सुविधा दिली आहे .यामध्ये आपल्या ग्रुपमधील एखाद्याशी गेम्स खेळता येणार आहेत . याचबरोबर यामध्ये आपण विविध वॉलपेपर्स ,साऊंड इफेक्ट्स , फोटो आदी गोष्टी आणि आपल्या आवडीचे अॅप्सही वापरू शकणार आहोत . भविष्यात गुगलच्या सर्व सुविधा म्हणजे कॅलेंडर , ई - मेल यालाही हँगआऊट करता येणार आहे . म्हणजे एकाच वेळी आपण एखादी गोष्ट आपल्या विविध मित्रांशी शेअर करू शकतो . त्यामुळे आता मित्रांसोबत हँगआऊट करण्यासाठी जीमेलचा नवा पर्याय खुला झाला आहे . 

Page 34 of 38 1 33 34 35 38
ADVERTISEMENT
error: Content is protected!