MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 12, 2012
in HowTo, News, इंटरनेट
ADVERTISEMENT
जगातील सर्वांत मोठे सर्च इं​जिन असलेल्या गुगलने देशभरातील युझर्ससाठी मोफत एसएमएस सेवा सुरू केली आहे . गेल्या मार्चपासूनच सुरू झालेली निवडक ग्राहकांपुरती ही सेवा गुगलने आता सर्वांसाठी खुली केली आहे . यासेवेद्वारे जीमेल चॅटच्या माध्यमातून मोबाइल फोनवर एसएमएस पाठवता येईल . या एसएमएसला फोनवरून रिप्लाय करता येईल. स्पॅम रोखण्यासाठी गुगलने प्रत्येक ग्राहकाला ५० एसएमएसचे क्रेडिट दिले आहे . वॉट्स अप ,निंबूझ यासारख्या मेसेज सेवांनी मोबाइलवर यापूर्वीच अधिराज्य निर्माण केल्याने गुगलचे हे पाऊल काहीसे उशीराच पडल्याचे मानले जाते . 

सध्या मोफत एसएमएस सुविधा देणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत . आता जीमेलनेही भारतात ही सोय उपलब्ध केली आहे . यापूर्वी आफ्रिका , उत्तर अमेरिका आणि आशियातील ५१ देशांमध्ये ही सुविधा सुरू होती . सर्वप्रथम२०११मध्ये आफ्रिकेतून या सुविधेची सुरुवात जीमेलने केली . भारतात प्रवेश करायला मात्र त्यांनी उशीर केला ,असंच म्हणावं लागेल . कारण याहूमेल आणि इंडियाटाइम्स यांसारख्या वेबसाइट्सवर एसएमएस सुविधाया आधीच उपलब्ध करून देण्यात आली होती . 

जीमेलची ही एसएमएस सुविधा मोफत उपलब्ध आहे . याआधारे जीमेलधारक मोबाइलवर जीमेल चॅटमार्फत एसएमएस पाठवू शकतात . या एसएमएसला आलेला रिप्लायही चॅटमध्ये दिसू शकेल आणि हे संभाषण चॅट हिस्टरीमध्ये सेव्ह केले जाईल . १० ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध झाली असून गुगल अॅप्सवरही ती उपलब्ध आहे . 

सध्या एअरसेल , आयडीया , लूप , एमटीएस , रिलायन्स , टाटा डोकोमो , व्होडाफोन यांसारख्या ऑपरेटरच्या मोबाइलवर हे मोफत एसएमएस पाठवता येतात . मात्र देशातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या एअरटेल आणि बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही .यापूर्वी मार्च महिन्यात केवळ काही मोजक्या ऑपरेटरसह ही सुविधा गुगलने सुरू केली होती . 

कसा करायचा एसएमएस ? 

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जीमेल काँटॅक्टमधील व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यावर ‘ ऑप्शन्स ‘ असा पर्याय येईल . त्यात ‘ सेंड एसएमएस ‘ पर्यायावर क्लिक केल्यास मोबाइल नंबर नमूद करण्याचा पर्याय येईल .त्याठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर अॅड केल्यास तुम्हाला त्या व्यक्तीच्या मोबाइलवर तुमच्या चॅटवरून थेट एसएमएस पाठ ‍ वता येईल . सुरुवातीला या सेवेमध्ये ५० मोफत एसएमएसचे ‘ क्रेडिट ‘ मिळणार असून प्रत्येक पाठविलेल्या एसएमएसबरोबर ते कमी होणार आहे . त्याचवेळी त्याला मिळालेल्या प्रत्येक रिप्लायनुसार पाच क्रेडिट वाढणार आहेत . मात्र ही मर्यादाही ५०ची असणार आहे . क्रेडिट शून्य झाले तर २४ तासानंतर तुमच्या खात्यात क्रेडिट जमा होईल . जीमेलवरून ही सुविधा मोफत असली , तरी तिला रिप्लाय करण्यासाठी केलेल्या एसएमएसला ऑपरेटरनुसार शुल्क लागू शकते . 
कोणत्याही जीमेल चॅटवरून एसएमएस नको असल्यास + ९१८०८२८०१०६० या क्रमांकावर STOP असाएमएसएम पाठवावा लागेल तर पुन्हा सुरू करण्यासाठी त्याच क्रमांकावर START असा एसएमएस पाठवावालागेल . 

जीमेलवर टाइप करा मराठीत 

जीमेलने आता मराठीसह इतर भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये थेट टायपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करूनदिली आहे . यापूर्वी गुगल ट्रान्सलिटरॉनच्या सहाय्याने ही सुविधा उपलब्ध होती . तुमच्या मेलमध्ये ही सुविधाअॅक्टिवेट करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन जनरल ऑप्शन्समधून लँग्वेज या पर्यायातून show all language options वर क्लिक करा . त्यात येणाऱ्या उपपर्यांयांमधून enable input tools वर क्लिक केल्यास तुम्हाला मराठी ,हिंदी , उर्दू , कन्नड , तेलगू , संस्कृत , अरेबिक , जर्मन यासारख्या जवळपास सर्व भारतीय आणि परकीय भाषांचापर्याय दिसेल . त्यातून तुम्हाला हव्या असलेल्या भाषा निवडा आणि सेटिंग्जमधील बदल सेव्ह करा . तुमच्याजीमेल होमपेजच्या हेडर बार तुम्हाला मराठीसाठी ‘ म ‘ हिंदीसाठी ‘ अ ‘ असे भाषानिहाय पर्याय दिसतील .तुम्हाला ज्या भाषेत टाइप करायचे असेल त्यावर क्लिक करा आणि ट्रान्सलिटरॉनच्या पद्धतीमध्ये ( उदा . ‘ मला ‘साठी mala ) टाइप करा की झाला तुमचा मराठीतील इमेल तयार . यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या फॉन्टची, विशेष सॉफ्टवेअरची गरज नाही .

Tags: ChatFreeGmailGoogleNimbuzzSMSWhatsAppYahoo
ShareTweetSend
Previous Post

विंडोज एक्सपीचे पॅकअप

Next Post

सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

May 11, 2023
एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

April 26, 2023
Next Post
सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे

सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!