MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गुगलच्या भाषांतराचे अजब-गजब !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 21, 2013
in इंटरनेट
google.jpgदेशात राजकीय पक्षांपासून सर्वांनाच सध्या लोकसभा निवडणूकांचे वेध लागले असताना गुगललाही ते लागल्याचे दिसतेय. म्हणून तर ‘ सोनिया जी आ रही है ‘ असे टाईप केल्यास त्याचे इंग्रजी भाषांतर ‘Coming Elections’ असे येतेय. एकदा तरी तपासून बघाच तुम्ही ‘ भाषाप्रभु ‘ गुगलचा हा पराक्रम. 


गुगल हे असे काही माहीतीचे जाळे आहे की , त्याच्या पोटात काय दडलयं याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात गुगलचे फार मोठे स्थानही आहे. जे कुठेही शोधून सापडत नाही ते गुगलवर हमखास सापडते असा गुगलचा खाक्या आहे. पण शेवटी म्हणतात ना जे पेरणार तेच उगवणार. संगणक आणि वेबसाईटचेही तसेच आहे. जे त्यात फिड करणार तेच तेथे दिसत असते. म्हणूनच जर तुम्ही भाषांतरासाठी गुगलचा आधार घेणार असाल तर तुम्हाला खुप सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. 


गुगलवर सध्या किमान ६५ भाषांच्या भाषांतराची सुविधा नेटकरांसाठी उपलब्ध आहे. साहजिकच भाषेच्या बाबतीत तुम्ही नक्कीच विश्वभ्रमणाचा आनंद एका क्लिकवर घेऊ शकता. पण अचूक भाषांतराची बोंबच आहे. त्यामुळे एखादा मजकूर दुस-या भाषेत रुपांतरीत केल्यानंतर गुगलचा भाषांतराबाबतचा डब्बागोल तुम्हाला अनुभवता येतो. 


सोनिया आणि निवडणूकांची सांगड घालणारे एक अजब भाषांतर गुगलने केले आहे.
 ( translate.gogle.com ) गुगलवर ‘ सोनियाजी आ रही है ‘ या वक्याचे इंग्रजी भाषांतर केल्यास Sonia is coming असे योग्य भाषांतर होते मात्र ‘ सोनिया जी आ रही है’, असे टाईप केल्यास ‘Coming Election’ असा त्याचा अर्थ गुगलचा ट्रान्स्लेटर दाखवत आहे.

ADVERTISEMENT
Tags: ElectionsGoogleGoogle TranslateSonia GandhiTranslate
ShareTweetSend
Previous Post

फेसबुकवरून मोफत कॉल?

Next Post

‘फेसबुक’ची नवी ‘सर्च क्रांती’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Next Post
‘फेसबुक’ची नवी ‘सर्च क्रांती’

'फेसबुक'ची नवी 'सर्च क्रांती'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech