MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स iOS

‘आयओएस ७’ अॅपलचा नवा प्लॅटफॉर्म

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 18, 2013
in iOS, ऑपरेटिंग सिस्टिम्स
ADVERTISEMENT

apple.jpgअॅपल कंपनीने २००७ मध्ये आयफोन लाँच करून स्मार्टफोनची नवी परिभाषा लिहिली होती. कंपनीने २००७ नंतर प्रथमच आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिमचे नवे व्हर्जन आयओएस ७ सादर करणार आहे. अमेरिकेत झालेल्या वर्ल्डवाइड डेव्हलपर परिषदेत आयपॅड आणि ‘ आयफोन ‘साठी वापरता येऊ शकणारे नवे व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. सध्याचे व्हर्जन हे बीटी व्हर्जन असून , सर्वांसाठी उपलब्ध व्हायला काहीसा वेळ लागणार आहे. आयफोन ४ आणि त्यापुढील मॉडेलसाठी ही ऑपरेटिंग सिस्टीम उपलब्ध होणार आहे.

नव्या ऑपरेटिंग सिस्टीमचा इंटरफेस हा कंपनीने सोपा ठेवला आहे. त्यामुळे यातील अनावश्यक बार आणि बटन्स काढून टाकण्यात आली आहेत. अॅप्लिकेशनच्या आयकॉनला नवे डिझाइन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेदर अॅप हे अॅनिमेटेड आहे आणि वादळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण कसे दिसू शकते , याची आभासी प्रतिमा कशी दिसू शकते , याचा डेमो देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे अॅप सुंदर दिसत आहे. पूर्वीचे मेसेज अॅप बंद झाले आहे. नव्या सिस्टीममध्ये याच्या रंगसंगतीतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नवे व्हर्जन हे पूर्णपणे वेगळे जाणवत आहे. नोटिफिकेशन सेंटर हे वरील बाजूस कायम असून , आता मेल , मिस कॉल आदी नोटिफिकेशन या ठिकाणी पहायला मिळणार आहेत. यात ‘ टुडे ‘ या नव्या फीचरचा समावेश करण्यात आला असून , दिवसभरात काय करायचे आहे , याची कल्पना यातून मिळणार आहे. स्क्रीन लॉक असतानाही नोटिफिकेशनवरील माहिती पाहता येऊ शकण्याची सोय यात आहे. नवे कंट्रोल पॅनल यात असून , ते खालील बाजूस आहे आणि खालून वरील दिशेने स्लाइड करून यूजर त्याचा अॅक्सेस करू शकतो. एअरप्लेन मोड चालू बंद करणे , वाय-फाय , ब्लूटूथ , डू नॉट डिस्टर्ब , व्हॉल्यूम आदी त्यात आहे ; तसेच कंट्रोल पॅनलमधून स्क्रीनचा ब्राइटनेस निश्चित करता येतो. कॅमेरा ,कॅलक्युलेटर , फ्लॅशलाइट , टायमर आदीही अॅक्सेस करता येते.

एखादे अॅप विशिष्ट वेळेला पाहण्याची सवय असणाऱ्या यूजरला नव्या सिस्टीममध्ये विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपोआपच संबंधित अॅपचा फीड स्क्रीनवर येतो. कॅमेऱ्यासाठी फिलरचे फीचर यात देण्यात आले आहे. फोटोसाठी अॅप नवे देण्यात आले असून , यात फोटो वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह होण्याऐवजी वेळ ,ठिकाण यानुसार सेव्ह होणार आहे ; तसेच फोटो अल्बममध्ये स्टोअर होऊ शकणार आहे. एअरड्रॉप हे नवे फीचर समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे व्हिडीओ , ई-मेल , फोटो आदी आयओएसवर अन्य यूजरशी शेअर करता येणार आहे. एअरड्रॉपला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अॅपवर हे सपोर्ट करू शकणार आहे.

नव्या ऑपरेटिंग सिस्टीममधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अॅपलने यामध्ये आयट्युन्स रेडिओ हे एक नवे फीचर अॅड केले आहे. आयट्युन्समध्ये यूझर्सने ऐकलेल्या आणि खरेदी केलेल्या गाण्यांच्या आधारे ही सर्व्हिस पर्सनलाइज्ड होणार आहे. येत्या काही महिन्यात अमेरिकेत जाहिरातींसह ही सेवा सुरू होणार आहे. जाहिरातींशिवाय या सुविधेचा लाभ घ्यायचा असल्यास दरवर्षी २५ डॉलर मोजावे लागतील. आयट्युन्स रेडिओमध्ये यूझर्सला विविध गाणी , कलाकारांनुसार स्टेशन्स तयार करावी लागतील. त्यानुसार युझर्स विविध गाणी या स्टेशन्समध्ये टाकून ती ऐकता येतील. पण इतर गाणी त्या स्टेशन्समध्ये कशी अॅड करायची हे अॅपलने स्पष्ट केलेले नाही. मात्र यामध्ये विशिष्ट गाण्याचे नाव टाइप करून ते ऐकण्याची सुविधा उपलब्ध नाही. गेल्याच महिन्यात गुगलने ऑल अॅक्सेस नावाची अशाच प्रकारची सेवा सुरू केली आहे. त्यासह पँडोरा , स्पॉटिफाय , रापसोडी या इतर सेवाही उपलब्ध आहेत.

Tags: AppleiOSiOS 7
ShareTweetSend
Previous Post

गुगलची ‘वेझ’क्रांती

Next Post

ऑनलाइन गुराढोरांची खरेदी-विक्री OLX AND Quickr

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
Apple Mac Mini iMac 2024

ॲपलचा नवा मॅक मिनी व iMac सादर : आता M4 व M4 Pro सह!

October 29, 2024
Next Post

ऑनलाइन गुराढोरांची खरेदी-विक्री OLX AND Quickr

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech