MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

फेसबुक F8 कार्यक्रम आणि फेसबुकवरील नव्या सोयी

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 14, 2016
in Events, Social Media
ADVERTISEMENT
फेसबुकच्या डेवलपर्ससाठी आयोजित F8 ह्या कार्यक्रमात फेसबुकने त्यांचा येत्या दहा वर्षांतील प्रवास कसा असेल यावर प्रकाश टाकला. फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग तसेच इतर अधिकारीसुद्धा यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी त्या त्या विभागाचे भविष्यातील प्रकल्पांचे डेमो दिले.
तर आता पाहूया फेसबुकने या कार्यक्रमात कोणकोणत्या नव्या गोष्टींची घोषणा केली …

  1. मेसेंजरमध्ये चॅटबॉट (ChatBots) : चॅटबॉट म्हणजे असा मार्ग ज्याद्वारे आपण आपल्या फेसबुक मेसेंजरमध्येच टोलफ्री क्रमांकासारखी सुविधा मिळवू शकतो. जसे की आपण आजचे हवामान काय असा प्रश्न मेसेज रूपात पाठवला तर चॅटबॉट आपल्याला लगेच आपल्या भागातील हवामानाची माहिती देईल तेसुद्धा फेसबुकच्या चॅट अॅप्लिकेशनमध्येच ! ह्या चॅटबॉटद्वारे कंपन्या त्यांच्या ग्राहकांना सपोर्ट देण्यासाठी/ कॉल सेंटर प्रमाणे देखील वापरू शकतात! मार्कच्या म्हणण्यानुसार आपण जसे एका मित्राला मेसेजद्वारे बोलतो तशाच प्रकारे आपल्याला कंपनीच्या सपोर्टशी सुद्धा बोलता आले पाहिजे.  
  2. Surround 360 : VR -Virtual Reality (आभासी वास्तव) हा सध्याचा सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय. अनेक मातब्बर कंपन्या ह्या बाजारात उतरत असून त्यांच्या फोनमध्ये VR हेडसेटची सुविधा देत आहेत. हयाद्वारे त्यांचे ग्राहक घरबसल्या जगातील अनेक गोष्टीचा प्रत्यक्ष तिथे असल्यासारखा अनुभव घेऊ शकतील! मात्र फेसबुकयासाठी विडियो शूटिंग करता याव म्हणून नवा VR कॅमेरा सादर केला आहे जो ३६० अंशामध्ये विडियो शूट करतो ! यामध्ये चक्क FullHD, 4K, 6K आणि 8K शूटिंगची सुद्धा सोय आहे! दिसायला तबकडीसारखा आकार असून यात तब्बल 17 लेन्स बसवल्या आहेत. 
  3. फेसबुकच्या माहितीनुसार आता फेसबुक मेसेंजर आणि व्हाट्सअॅपमध्ये पाठवले जाणारे मेसेज SMS द्वारे पाठवलेल्या मेसेजच्या तिप्पट प्रमाणात आहेत! SMS 20 बिलियन तर फेसबुक+व्हाट्सअॅप 60 बिलियन!
  4. फेसबुक लाईव्ह : फेसबुकने हल्लीच सर्वांसाठी Live Video स्ट्रीमिंगची सोय कारून दिली आहे ज्याद्वारे आपण एखाद्या ठिकाणांहून टीव्हीसारखा Live Video सुरू करू शकतो आणि आपले फेसबुक मित्र तो विडियो कोठूनही पाहू शकतात! यासाठी त्यांनी आता नव्या पार्टनरची घोषणा केली असून DJI ड्रोन, LiveStream ही त्यापैकीच काही मोठी नावे … 

  5. प्रोफाइल विडियो : होय आता फेसबुकच्या प्रोफाइल फोटोच्या जागी एक विडियोसुद्धा लावता येणार आहे! यासाठी आपण Instagram, Cinemagraph, Vine  ह्या अॅपमध्ये शूट केलेले विडियो सुद्धा वापरू शकतो !  कसे करायचे ते पहा ह्या लिंकवर > फेसबुक प्रोफाइलला विडियो कसा लावायचा ?
  6. VR सेल्फी : आता चक्क VR मध्ये पाहत असलेल्या ठिकाणी सुद्धा सेल्फी काढण्याची किमया करता येणार आहे. समजा तुम्ही पुण्यात बसला आहात, VR मधून तुम्ही स्वीत्झर्लंडमधील ठिकाणाचा अनुभव घेत आहात तर तुम्हाला स्वीत्झर्लंडमधील दृश्याचा तुमच्यासोबत सेल्फी काढता येईल !
काही दिवसांपूर्वीच व्हाट्सअॅप मध्ये End-To-End encryption ची सुविधा सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे तुमचे संभाषण अतिशय सुरक्षित होणार असून तुमच्या संभाषणातील मेसेज केवळ तुम्हाला आणि तुम्ही ज्याला मेसेज पाठवला आहे त्यांनाच वाचता येईल. (यापूर्वी आपल्या नेटवर्क प्रोवायडर किंवा WiFi देणार्‍य कंपनीकडून ते वाचले जाण्याची शक्यता होती. ) या Encryption मुळे तुमचे चॅट, मेसेज कोणालाही हॅक करता येणार नाहीत. 
          
Tags: Chat BotsFacebookVR
ShareTweetSend
Previous Post

अॅपल LoopYouIn कार्यक्रम : अॅपल आयफोन SE, आयपॅड प्रो…

Next Post

मराठीटेक २.० : मराठीटेकवर येत आहेत नवे विभाग

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
ॲपलचा Vision Pro व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट जाहीर!

ॲपलचा Vision Pro व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट जाहीर!

June 6, 2023
Apple WWDC 2023

ॲपलचा WWDC23 कार्यक्रम : iOS 17, macOS Sonoma अपडेट्स जाहीर!

June 6, 2023
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Next Post

मराठीटेक २.० : मराठीटेकवर येत आहेत नवे विभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!