Moto G6 Plus भारतात सादर : मोटोकडून आणखी निराशा!

मोटोने त्यांच्या प्रसिद्ध मोटो जी मालिकेत नवा फोन  मोटो जी ६ प्लस आज सादर केला आहे. मोटो जी ६ प्लस आजपासूनच अॅमॅझॉनवर त्याचबरोबर रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये नवीन स्मार्ट कॅमेरा सिस्टिम, ऑल डे बॅटरी + Turbopower, मल्टि फंक्शन फिंगरप्रिंट, पाण्यापासून संरक्षणासाठी कोटींग, स्टॉक अँड्रॉइड, फेस अनलॉक यांसारखे फिचर्स असतील.

शायोमीचा पोको F1 तसेच Honor Play यांमध्ये अनुक्रमे Snapdragon 845, Kirin 970 सारखे प्रोसेसर जवळपास २१ हजारांच्या किंमतीमध्ये त्याचबरोबर नोकिया ६.१ प्लसमध्ये सुद्धा Snapdragon 636  मिळत असताना मोटो जी ६ प्लसमध्ये असणाऱ्या Snapdragon 630 सोबत ग्राहकांना आकर्षित करणे मोटोसाठी खरेतर अवघडच असेल. हा फोन एप्रिलमध्ये बाहेरच्या देशांत उपलब्ध झाला होता!

Moto G6 Plus Specifications
डिस्प्ले : 5.9 inch (2160х1080) FHD+ 18:9 Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 630 (Octa Core 2.2GHz)
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 256GB)
बॅटरी :3200 mAh Battery with Turbopower Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.0
कॅमेरा : 12MP + 5MP
फ्रंट कॅमेरा : 16MP
रंग : Indigo Black
सेन्सर : Fingerprint reader, Accelerometer, Gyroscope, Ambient light, Proximity, Magnetometer, Ultrasonic
इतर : USB Type-C, Dual Sim Slot + microSD Card Slot, 3.5mm Audio Jack, Glass back, Water repellent nano-coating,Dolby Audio, Corning Gorilla Glass 3
किंमत – ₹२२,४९९

लिंक - Moto G6 Plus

Moto G6 Plus भारतात सादर : मोटोकडून आणखी निराशा! Moto G6 Plus भारतात सादर : मोटोकडून आणखी निराशा! Reviewed by Swapnil Bhoite on September 11, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.