MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #2

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
October 28, 2018
in ॲप्स

उपयोगी अॅप्स मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये आपण आणखी काही चांगले अॅप्स पाहणार आहोत. या मालिकेद्वारे आमचा प्रयत्न आहे की काही चांगले अॅप्स ज्यामध्ये काही नावाजलेले असतील तर काही भन्नाट अॅप्सची वाचकांना ओळख व्हावी. आम्ही दिलेल्या अॅप्सना तुमच्या विशिष्ट गरजेनुसार आणखी चांगले पर्याय सुद्धा उपलब्ध असू शकतात त्याचा सुद्धा आपण शोध घेऊ शकता. आपल्या प्रतिक्रियांसोबतच जर आपणास कोणते अॅप या लेखामध्ये सुचवायचे असेल तर आम्हाला अवश्य कळवा.

Settle Up – Group Expenses : अनेकदा ग्रुपमध्ये फिरायला जाताना असो की होस्टेलवर एकत्र राहताना, आपणास कोणी केव्हा आणि किती पैसे दिले वगैरेचे हिशोब ठेवावेच लागतात. यासाठीच Settle Up हे अॅप नक्कीच उपयोगी पडते. यामध्ये एकट्याने नोंदी ठेवता येतात किंवा सर्वांनी मिळून सुद्धा. जमा केलेल्या रकमेसोबतच तिथे कशासाठी खर्च केला आहे याची माहिती सुद्धा लिहिता येते. यामध्ये एक चांगली सुविधा असून जेव्हा शेवटचा हिशोब करण्याची वेळ येते त्यावेळेस आपणास डायरेक्ट कोणत्या मेंबरने किती रक्कम कोणाला द्यायची आहे याबद्दल समजते. या अॅपचे वेब व्हर्जन सुद्धा उपलब्ध असून सर्व डेटा ई-मेल करण्याची सुविधा तसेच CSV एक्स्पोर्ट (मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पाहता येईल) ची सुविधा उपलब्ध आहे.

डाउनलोड लिंक – Settle Up – Group Expenses

Your Phone Companion : मोबाईलमध्ये फोटो काढल्यानंतर मोबाइलमधून डेस्कटॉपवर पाठवताना डेटा केबल जोडण्याच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी हे अॅप नक्कीच उपयोगी पडते. सोबतच मोबाइलवर आलेले मेसेज सुद्धा यामधून वाचता येतात.  मायक्रोसॉफ्ट तर्फे हे उपलब्ध करून देण्यात आले असून येत्या काळात यामध्ये अनेक नवीन सुविधांची भर पडण्याची शक्यता आहे. सध्या लेटेस्ट २५ फोटोच यामधून इंटरनेटद्वारे शेअर करता येतात. यासाठी आपल्या डेस्कटॉपवर Your Phone अॅप असणे आवश्यक आहे. जर आपणाकडे विंडोज १० लेटेस्ट व्हर्जन असेल तर यामध्ये आधीपासूनच हे अॅप उपलब्ध आहे.

डाउनलोड लिंक –  मोबाईल / डेस्कटॉप

LastPass Password Manager : आपले खूप सारे अकाउंट व त्यांचे पासवर्ड लक्षात ठेवणे खूपच अवघड होऊन जाते अशामुळे एकसारखे पासवर्ड वापरले जातात व यामुळे एखादा पासवर्ड किंवा त्याबद्दलची कोणतीही माहिती वाईट व्यक्तींच्या हाती लागल्यास आपल्या ऑनलाईन सुरक्षिततेमध्ये धोके उद्भवू शकतात. यासाठीच लास्टपास हे अॅप उपयोगी पडते.  तुम्ही फक्त ‘पासवर्ड मॅनेजर’ चा मास्टर पासवर्ड हा  एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा आणि बाकी सर्व पासवर्ड पासवर्ड मॅनेजर लक्षात ठेवेल. इथे तुम्ही फक्त पासवर्डच नाही तर आणखी ही माहिती साठवू शकता जसे नोट्स, डॉक्युमेंट, फॉर्म फिल्स आणि बरेच काही…ही Encrypted (सांकेतिक भाषेत) साठवलेली असल्याकारणाने  (Lastpass स्वतः सुद्धा तुमचा Encrypted पासवर्ड/डाटा पाहू शकत नाही) जरी Lastpass चा डाटा लीक झाला तरी त्याचा उपयोग करता येत नाही.

याबद्दल आमचा लेख पहा – पासवर्ड मॅनेजर्स…

डाउनलोड लिंक –  LastPass Password Manager

Firefox Rocket – Fast and Lightweight Web Browser : काही दिवसांपूर्वी फायरफॉक्सतर्फे हे अॅप सादर करण्यात आले असून UC Browser सारख्या अॅपद्वारे होणाऱ्या डेटा लीक तसेच येणाऱ्या नोटिफिकेशन्स, अॅपमधील नको असलेल्या न्युजपासून  सुटका मिळविण्यासाठी हे अॅप नक्कीच उपयोगी पडते. हे हलके असे अॅप असून वापरण्यास सुद्धा सोपे आहे. त्याचबरोबर डेटा सेव्ह, अॅड ट्रॅकिंग, ट्रॅकिंग प्रोटेक्शन, पेज ऑफलाईन सेव्ह करण्याची सोय, यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

डाउनलोड लिंक –  Firefox Rocket

ADVERTISEMENT
Tags: AppMitraAppsBrowserFirefoxLastPassPhone CompanionSettleUp
ShareTweetSend
Previous Post

व्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स! : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध!

Next Post

रेडहॅट कंपनीची आयबीएमकडून खरेदी : ओपन सोर्स कंपनीची अडीच लाख कोटींना विक्री!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

May 10, 2023
एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

April 26, 2023
Next Post
रेडहॅट कंपनीची आयबीएमकडून खरेदी : ओपन सोर्स कंपनीची अडीच लाख कोटींना विक्री!

रेडहॅट कंपनीची आयबीएमकडून खरेदी : ओपन सोर्स कंपनीची अडीच लाख कोटींना विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!