व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय!


हल्ली व्हॉट्सअॅपवर रोज एक नवी सोय जोडली जात असल्याचं दिसत आहे. नव्याने आलेल्या सुविधांमध्ये स्टिकर्सचा समावेश झाल्यावर आता ग्रुपमध्ये आलेल्या संदेशाला वैयक्तिक रिप्लाय देता येणार असून यामुळे तो रिप्लाय सर्व ग्रुप मेंबर्सना न दिसता फक्त ज्याच्या मेसेजला रिप्लाय केला आहे त्यालाच दिसेल!

ही सोय सध्या फक्त beta व्हर्जन (चाचणी आवृत्ती) असलेल्या वापरकर्त्यांना उपलब्ध आहे. WhatsApp version 2.18.335 जवळपास वर्षभर या सुविधेसाठी व्हॉट्सअॅप काम करत आहे. लवकरच सर्वच युजर्सना ही सोय उपलब्ध करून देण्यात येईल!

प्रायव्हेट रिप्लाय ही सुविधा नेहमीच्या रिप्लाय सुविधेप्रमाणेच असून याद्वारे केलेला रिप्लाय पर्सनल मेसेजमध्ये जातो ज्यासोबत ग्रुपमधला मेसेज जोडलेला असेल. यामुळे ग्रुपमधील इतर सदस्यांना न सांगता फक्त त्या संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीलाच त्यासंबंधी बोलायचं असेल तर ही सोय उपयुक्त ठरेल.
काही दिवसांपूर्वीच एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असेल तर त्या मेसेजला उजवीकडे सरकवत स्वाईप केल्यास लगेच रिप्लाय करता येण्याचीसुद्धा सोय आली आहे. 

लवकरच व्हॉट्सअॅप  स्टेट्समध्ये जाहिराती टाकायला सुरुवात करणार असून याबद्दल अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आला आहे! यामुळे फेसबुकला व्हॉट्सअॅपमार्फत पैसे मिळवता येतील आणि विविध कंपन्या/उद्योगांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. हे कधी सुरु होईल याबद्दल मात्र कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

search terms : how to use whatsapp group message private replay feature
व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय! व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय!    Reviewed by Sooraj Bagal on November 05, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.