MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 20, 2012
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स

‘ विंडोज फोन ८ ‘ हे मायक्रोसॉफ्टचं सर्वात प्रसिद्ध आणि प्रगत व्हर्जन. सध्या ‘ विंडोज ८ ‘ पीसी ओएसच्या बाबतीत जितकी उत्सुकता आहे. तितकीच उत्सुकता ‘ विंडोज फोन ८ ‘ या मोबाईल ओएस विषयीसुद्धा दिसून येत आहे. या मोबाईल ओएसमुळे विंडोज फोन्ससाठी अधिक चांगला हार्डवेअर सपोर्ट तयार झाला आहे. या आधीच्या सर्व विंडोज व्हर्जन्समध्ये फक्त सिंगल कोअर प्रोसेसरची क्षमता होती. परंतु ‘ विंडोज फोन ८ ‘ ओएस असलेल्या डिव्हाइसमध्ये मल्टी कोअर प्रोसेसर सपोर्ट होऊ शकतो. यामुळे तुम्ही विंडोज फोन अधिक चांगल्या व जलद रीतीने ऑपरेट करू शकता. ‘ विंडोज फोन ८ ‘ मोबाईल ओएस असलेल्या डिव्हाइसमध्ये तुम्हाला मेमरी एक्सपांड करण्याची (मेमरी कार्ड) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ विंडोज फोन ८ ‘ या ओएसमध्ये १२८० x७२० पिक्सेल रिझोल्युशन आता सपोर्टेड आहे. या ओएसमुळे तुम्हाला विंडोज फोनमध्ये ऑफलाईन मोडवरसुद्धा टर्न बय टर्न डायरेक्शन सहित मॅप्स अॅक्सेस करता येऊ शकतात. यामध्ये विंग सर्च इंजिन , तसेच विंग मॅप्स आहेत. 
                             यामध्ये तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर १०चा अनुभव तुमच्या विंडोज फोनवर घेऊ शकता. या इंटरनेट एक्सप्लोरर १० मुळे जलद सर्फिंग करता येईल. तसेच यामध्ये सोशल नेटवर्किंगचे इनबिल्ट पर्याय उपलब्ध आहेत. लॉटमेल , विंडोज लाइव्ह मेसेंजर , फेसबुक , ट्विटर , लिंक्डइन याद्वारे तुम्ही अगदी सहजपणे सोशल नेटवर्किंग करू शकता. 

मायक्रोसॉफ्ट उत्पादनांची  नवीन चिन्हे   

                              विंडोज फोन ८ मध्ये ‘ पीपल हब ‘ हे अॅप अधिक प्रगत आहे. ज्यामुळे स्टेटस पोस्ट ,अपडेटस याद्वारे सोशल नेटवर्किंग जलद करू शकता. तुमची आवडती गाणी आणि मूव्हीजसाठी यामध्ये म्युझिक + व्हिडियो हब उपलबध आहे. यामुळे आवडती गाणी ऐकणं , व्हिडिओ पाहणं , शेअर करणं या गोष्टी सहज शक्य होईल. या ओएसमधील ‘ पिक्चर हब ‘ मुळे फोटो शेअरिंग , मित्रमैत्रिणींचे ऑनलाईन अल्बम या गोष्टी सहजपणे पाहता येतील. या ओएसमध्ये ‘ आऊटलूक मोबाईल ‘ हे अॅपही उपलब्ध आहे. ज्यामुळे इमेलचा जलद आणि सहज अनुभव तुम्हाला घेता येईल. ‘ विंडोज फोन ८ ‘ या मोबाईल ओएसमध्ये तुम्हाला हव्या त्या मूव्हीज रेस्टॉरंटसची माहिती मिळवता येऊ शकते. 
                                 तुमच्या विंडोज फोनची चोरी झाली तर विंडोज फोन डॉट कॉमवर जाऊन फाइंड माय फोन या पर्यायाद्वारे तुम्ही त्यावर कॉल करू शकता किंवा तो लॉक करून त्यातील डेटा डिलीट करू शकता. यातील ‘ ऑफिस हब ‘ या अॅपद्वारे वर्ड , एक्सेल , पॉवर पॉईंट यांचे मोबाईल व्हर्जन तुम्ही फोनवर मिळवू शकता.  मायक्रोसॉफ्ट एक्सपर्टसनी विंडोज मार्केट प्लसमध्ये एक लाख अॅप्स उपलब्ध करून दिलेत. परंतु अॅपल अॅप्स स्टोर आणि गुगल प्ले स्टोअरच्या तुलनेत ते खूप कमी आहेत. ‘ सर्फेस ” या टॅबद्वारे मायक्रोसॉफ्ट लवकरच ‘ विंडोज ८ ओएस ‘ लाँच करणार आहे. नोकिया ल्युमिआ ९२० आणि ८२० एचटीसी ८ x आणि ८.५ , सॉमसंग अॅटिव्हएस हे विंडोज फोन ८ ओएस असलेले काही आगामी विंडोज फोन्स आहेत.

ADVERTISEMENT

—           चैतन्य साळगांवकर

                                  

Tags: ExplorerInternetMicrosoftOfficeSkyDriveSurfaceWindows 8Xbox
ShareTweetSend
Previous Post

टॅबलेट आणि स्‍मार्टफोन असलेला ASUS चा पॅडफोन- 2

Next Post

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

June 10, 2024
मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

January 17, 2024
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : Starfield सोबत अनेक नव्या गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : Starfield सोबत अनेक नव्या गेम्स जाहीर!

June 13, 2023
Next Post
जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech