Sooraj Bagal

Sooraj Bagal

बीबीएम- ब्लॅकबेरी मेसेजिंग अॅपल आणि अँड्रॉइडवरही!

                    आतापर्यंत ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टिम , बीबीएम यांसारख्या सुविधांचा अनुभव फक्त ब्लॅकबेरीधारकांनाच घेता येत होता . त्या जोरावर ब्लॅकबेरीने कित्येक वर्षे वर्चस्व गाजवले . पण आता अॅपल आणि अँड्रॉइड वापरणाऱ्यांनाही बीबीएमचा मोफत लाभ घेता येणार आहे . त्यामुळे व्हॉट्सअॅप किंवा आयमेसेज सारख्या सेवांचा वापर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . असे असले तरी या क्रॉस फंक्शनालिटीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे , हे मात्र निश्चित .                     ...

इंटरनेटची पाचवी पिढी – 5G Network invented by Samsung Korea

माणसाच्या इंटरनेटसोबतच्या नात्याची वीण दिवसेंदिवस घट्ट होऊ लागली आहे . इंटरनेट सुरू झाल्यापासूनचा प्रवास सर्वांनाच परिचित आहे . कम्प्युटरवर केबलच्या माध्यमातून चालणाऱ्या इंटरनेटने केव्हाच कात टाकली आणि वायरलेस कम्युनिकेशनने जोर पकडला . त्यातही आता मोठ्याप्रमाणावर प्रगती झाली आहे .  ' वाय - फाय ' मुळे इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊलागले . लॅपटॉप , हँडसेटवरही इंटरनेट सुरू झाले आणि मग स्पर्धा सुरू झाली , ती इंटरनेटच्यावेगाची . या वेगाच्या सूत्राला अनुसरून मग पहिल्या पिढीचे ( फर्स्ट जनरेशन ), दुसऱ्या पिढीचे (सेकंड जनरेशन ) तंत्रज्ञान बाजारात आले . पहिल्यापेक्षा दुसरे अधिक फास्ट असे हे सूत्र . वेग वाढवण्यातही मोठी स्पर्धा चालू असून अधिकाधिक वेग कसा वाढवता येईल , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .  ' सॅमसंग ' ने याबाबतीत मोठी झेप घेतली असून अतिजलद पाचव्या पिढीच्या ( ५जी ) वायरलेस तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे . ' सॅमसंग ' च्या नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट आणि मोबाइल क्षेत्रात क्रांती घडणार आहे . यामुळे एखादा मोठा चित्रपटसुद्धा एका सेकंदात डाऊनलोड करता येईल . दोन किमीच्या अंतरामध्ये सेकंदाला एक गिगाबाइट एवढा डेटा डाउनलोड करण्याची चाचणी यशस्वी झाल्याचे दक्षिण कोरियाच्या या कंपनीने सांगितले आहे . हे तंत्रज्ञान त्वरित बाजारात उपलब्ध होणार नाही . त्यासाठी आणखी किमान पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल . २०२० पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात येईल . तोपर्यंत कंपनी ' ट्रान्समीटिंग स्पीड ' उपलब्ध करणार आहे . सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चौथ्या पिढीच्या ( ४जी ) तंत्रज्ञानापेक्षा याचा वेग शंभर पटीने अधिक असेल , असा दावा कंपनीने केला आहे . अनेक ' हेवी फाइल्स ' फारसा त्रास न घेता मूव्ह करता येणार आहे . या तंत्रज्ञानामुळे ३डी चित्रपट , गेम्स , अल्ट्रा हाय डेफिनिशन कंटेन्ट ( यूएचडी ) या सेवांचा वापर यूजर विनासायास करू शकतील . मिलिमीटर वेव्हबँडचा वापर करून घेण्याचे तंत्रज्ञानही कंपनीकडे आहे . त्याचा फायदा मोबाइल इंडस्ट्रीला होईल . ' सॅमसंग ' तर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत ' ६४अँटेना एलिमेंट ' चा वापर करण्यात आला . यामुळे लांब अंतरावरून येणाऱ्या ' डेटा ' ला अडथळा झाला नाही . जगामध्ये सर्वाधिक वायर नेटवर्क असलेल्या दक्षिण कोरियासारख्या देशात आत्ताच ४जीतंत्रज्ञान वापरणारे दोन कोटी लोक आहेत . ज्या मानवी मेंदूतून पाचव्या पिढीपर्यंतच्या ( ५जी ) तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे आणि इतर अनेक क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर मानव आकाशाला गवसणी घालत आहे , त्या या मेंदूच्या ' स्पीड ' चाउपयोग प्रत्यक्षात करण्यात आला , तर ती जागतिक क्रांती ठरेल . अर्थात त्यासाठी आणखी कितीपिढ्यांचे ( ४जी , ५जी , ६जी , ७जी ...) तंत्रज्ञान बाजारात येईल , कोण जाणे ! 

‘अॅप’ टू डेट व्हॉटसअॅप पर्याय

व्हॉटसअॅप नाही असे स्मार्टफोन युजर फारच कमी असतील . पण प्रत्येकाकडे व्हॉटसअॅप आहे ,मग आपल्याकडे त्यापेक्षा वेगळे काही तरी असले पाहिजे असे अनेकांना वाटते . व्हॉटसअॅपला पर्याय असलेले अनेक अॅप उपलब्ध आहेत . अशाच काही अॅप्सविषयी ...  वायबर अॅप वायबर अॅप हे व्हॉटसअप सारखेच आहे . यात आपल्याला एका कोडद्वारे रजिस्टर करता येतेआणि ते आपल्या फोनवर मेसेजद्वारे मिळते . फोनमधले कॉन्टॅक्ट्स स्वत : शोधून हे अॅपआपल्याला मित्र - परिवाराशी जोडते . हे अॅप तुमच्या फोनमधील अॅड्रेस बुकमधील अन्य कॉन्टॅक्ट्सआधीपासूनच वायबरवर जोडलेले आहेत का , ते तपासून पाहते . या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे , याअॅपद्वारे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून फोन करता येतो तोही फ्री . यात ३जी आणिवायफायमध्ये सर्वात उतम व्हॉइस क्वालिटीमध्ये कॉल करता येतो .  वुई - चॅट हे चीनमधील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे . यामध्ये रजिस्टर करण्याची प्रक्रिया ही व्हॉटसअॅपसारखीच आहे . कारण यातही प्रोसेस आपल्या मोबाइल नंबर एंटर करण्याची आहे . त्यानंतरएक फॉलोअप मेसेज मिळतो , ज्यात तुमचा व्हेरिफिकेशन कोड असतो . यामध्ये तुम्हाला तुमचेफेसबुक आणि इतर ईमेल अकाउंट्स कनेक्ट करून अधिक लोकांशी जोडणे सोपे होते . या अॅपचीअन्य आकर्षणे म्हणजे शेअरिंग पिक्चर्स , काँटॅक्ट्स , युजरचे करेक्ट लोकशन आणि व्हिडिओ चॅट.  चॅट - ऑन चॅट - ऑन हे सॅमसंग कंपनीने तयार केलेले अॅप आहे . हे अॅप एक बेसिक मेसेजिंग अॅप मानलेजाते . यात कॉलिंग फीचर्स उपलब्ध नाहीत . हे अॅप सॅमसंगचे असले , तरी हे सगळ्या मोबाइलप्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे . या अॅपच्या नोंदणीसाठी सॅमसंग अकाउंटचा वापर करता येतो किंवाही प्रक्रिया वगळून डायरेक्ट नाव आणि नंबर रजिस्टरकरून हे अॅप वापरता येते . हे अॅप तुमच्याफोनमधले ऑनबोर्ड काँटक्ट्स स्वतः चेक करून या अॅपचे इतर यूजर्स शोधते . या अॅपद्वारेआपल्याला फक्त चॅट - ऑन यूजर्सशी चॅट करता येते .  किक मेसेंजर किक मेसेंजरमध्ये आपल्याला आपल्या ई - मेल आयडीद्वारे रजिस्टर करून एक युनिक यूजरनेमनिवडता येते . या अॅपमध्ये यूजर आयडीने इतर लोक आपल्याला शोधू शकतात . हे अॅप ईझी टूयूज आहे आणि ऑन टाइम मेसेज पण पाठवते . या अॅपमध्येही कॉलिंग फीचर्स उपलब्ध नाहीत .पण हे अॅप विविध मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर वापरता येते .  लाइव्ह प्रोफाइल लाइव्ह प्रोफाइल हे अॅप ईमेल अकाउंटद्वारे रजिस्टर करता येते . तुमचा फोन नंबर या अॅपमध्येदाखल केल्याने दुसऱ्या यूजर्सना तुम्हाला शोधता येते . प्रत्येक अकाउंटला एक लाइव्ह प्रोफाइल पीनदिला जातो , जो आपल्याला आपल्या मित्रांशी शेअर करता येतो . या अॅपमध्ये तुम्हाला कॉलिंगफीचर्स उपलब्ध नाहीत . पण मेसेजिंगद्वारे पिक्चर्स , व्हिडिओस शेअर करून किंवा ग्रुप चॅटनेसंवाद साधता येतो .  स्काइप स्काइपमध्ये तुमच्या माइक्रोसॉफ्ट अकाउंटमधून साइन इन करून तुमचा मेसेंजर मिळवता येतो ,ज्यात हॉटमेल आणि आउटलुकच्या काँटॅक्ट्सना एकत्र आणता येते . या अॅपद्वारे तुम्हाला तुमच्याखूप जुन्या फ्रेण्ड्ससोबत कनेक्टेड राहता येते . स्काइप हे अस अॅप आहे , ज्यात आपल्याला फ्रीकॉल व टेक्स्ट मेसेज करता येतात , पण फक्त स्काइप यूजर्ससोबत . परंतु तुम्हाला हव्याअसलेल्या युजर्सना अप्रुव्ह करून तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता येतो . हे अॅप त्याच्यारिलायेबिलिटी आणि स्टेबिलिटीसाठी प्रसिद्ध आहे .  काको टॉक मेसेंजर हे अॅप तुमचा फोन नंबर डिटेक्ट करून तुम्हाला मेसेजद्वारे ४ डिजिट व्हेरिफिकशन कोड मेसेजपाठवते . ही प्रोसेस संपल्यावर ते आपल्या काँटॅक्ट्समधील युजर्सना शोधते . या अॅपमध्ये तुम्हालापिक्चर्स , ऑडियो नोट्स , कॅलंडर आणि काँटॅक्ट इन्फर्मेशन शेअर करता येते . या अॅपचे वैशिष्ट्यम्हणजे , याद्वारे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून फ्री कॉलही करता येतो . हे वायबार अॅपसारखेचआहे .  फेसबुक मेसेंजर हे अॅप तुम्हाला तुमच्या फ्रेंडसशी चॅट करण्यात मदत करते . या अॅपचे इंटरफेस चांगले आहे . पण हे अॅप अतिशय स्लो आहे . यामधून तुम्हाला केवळ तुमच्या फेसबुक फ्रेंडशीच चॅट करता येऊ शकते. यामुळे हे वॉटस अॅपसाठी पर्याय न ठरता ते त्याच्यासोबत वापरता येणारे एक अॅप असू शकते .  लाइन अॅप लाइन अॅप तुमचा फोन नंबर त्याच्या डेटाबेसशी जोडते , ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फोन काँटॅक्ट्समधील लाइन यूजर्सशी सहज संवाद साधता येतो . या अॅपमध्ये रजिस्ट्रिंग प्रोसेस वायबरसारखीच आहे आणि या अॅपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पीसी किव्हा मॅक - ओएस द्वारेही रिप्लाय करता येतो . मेसेजिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाइन यूजर्सशी इंटरनेटचा वापर करून फ्रीफोन करता येतो .  ग्रूप - मी ग्रूप - मी हे नाव ऐकून तुम्हाला कळलच असेल की हे अॅप ग्रूप चॅटसाठी खूप उपयुक्त आहे . हे अॅप व्हॉटसअपसारखे आहे , ज्यात आपल्याला एका कोडद्वारे रजिस्टर करता येते आणि ते आपल्या फोनवर मेसेजद्वारे मिळते . या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे , तुम्हाला ग्रुप चॅट मेसेजिंगद्वारेही संवाद साधता येतो . म्हणजेच तुमच्या मित्रांमधील कोणाकडे ३जी कनेक्शन नसेल ,तरीही त्याला या ग्रुप चॅटमधील मेसेज मिळतील आणि तेही फक्त काही ठराविक फी मोबाइल ऑपरेटरला देऊन. अमेरिकेतील व्यक्तींना मेसेज पाठवण्यासाठी प्रत्येक मेसेजसाठी पैसे आकारले जातात . >> पराग मयेकर 

AMAZING WEBSITE: इंटरनेट वापरणा-यांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त

AMAZING WEBSITE: इंटरनेट वापरणा-यांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त

SourceForge www.sourceforge.net-  संगणक आणि इंटरनेटवर काम करणार्‍या व्यक्तींसाठी ही एक उपयुक्त साइट आहे. या साइटवर नियमित वापरले जाणारे अनेक सॉफ्टवेअर...

तुमच्यावर ‘नजर’ आहे

मोठमोठ्या कंपन्या , देशातील गुप्तहेर आणि संरक्षण दलात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर ,त्यांचे ई-मेल्स , फोन कॉल्सवर नेहमी नजर ठेवली जाते. त्यांच्या ई-मेल्समध्ये काही आक्षेपार्ह...

Page 271 of 317 1 270 271 272 317
ADVERTISEMENT
error: Content is protected!