मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स
कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी...
कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी...
गेल्या काही वर्षांत मोझिला , ओपेरा , क्रोम यासारखे अनेकब्राऊझर बाजारात आले . त्यातील सोयीसुविधांमुळे इंटरनेट एक्सप्लोअररकडे ( आयई ) काही अंशी दुर्लक्ष झाले .त्यामुळे आयईमध्ये स्वतः तयार केलेल्या वेबसाइटचे सर्व फीचर्स योग्यरितीने चालतील याची खात्री डेव्हलपर्सला नसते . त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने ' मॉडर्न . आयई ' ही वेबसाइट तयार केली आहे . या वेबसाइटवर वेबसाइट टेस्टिंगचे सर्व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . त्यात नव्याजुन्या सर्व आयईमध्ये चालू शकतील अशा वेबसाइटचे टेस्टिंग करता येते . यात वेबसाइट टेस्टिंगचे टूल मोफत देण्यात आले आहे .वेबसाइटच्या एचटीएमएल कोडिंगचे पूर्ण स्कॅनिंग यात होते आणि नव्याजुन्या आयईवर कुठे काही प्रॉब्लेमयेण्याची शक्यता वाटली ; तर लगेच अॅलर्ट दिला जातो . केवळ अॅलर्ट देऊनच ही वेबसाइट थांबत नाही , तर कशापद्धतीने कोड लिहिला म्हणजे त्याला प्रॉब्लेम येणारनाही हे देखील सुचविते . यात मोबाइल , टॅब , मोठे मॉनिटर यावर वेबसाइट योग्य रितीने कशी दिसेल यासाठीहीमदत केली जाते . विंडोज ८ वर वेबसाइट व्यवस्थित चालावी यासाठीही याठिकाणी मदत केली जाते . यावेबसाइटवर नव्या सिस्टीमसाठी आवश्यक कोडिंगबाबत १०० टक्के मार्गदर्शन केले जात नसले तरी , सध्याच्याकोडिंगमधील ८० - ९० टक्के कमतरता दूर करण्यासाठी मदत केली जाते , असे आयईचे जनरल मॅनेजर रायनगाविन म्हणतात . या व्यतिरिक्त साइटच्या चेकिंगसाठी मायक्रोसॉफ्टने दोन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात साइटची व्हर्च्युअल मशीनवर टेस्टिंग करण्याची सोय आहे . Link to Click Here >>>>> modern.ieम्हणजे नवीन साइट विंडोज एक्सपी असणाऱ्या मशिनमध्ये आयई ६ वर , विस्टाच्या मशीनमध्ये आयई ७ वर ,विंडोज ८च्या मशीनवर आयई ८ मध्ये तुमची वेबसाइट कशी काम करेल हे ती ऑपरेटिंग सिस्टीम , सॉफ्टवेअरइन्स्टॉल न करताही चेक करता येऊ शकते . सध्या तरी विंडोज आधारित मशिनवर ही सुविधा उपलब्ध असून ,लवकरच लिनक्स आणि ओएसवर चालणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे . मायक्रोसॉफ्ट एवढ्यावरच थांबलेली नाही तर , वेबसाइटची अधिकाधिक टेस्टिंग करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टने ब्राऊझर स्टॅकसोबत करार केला असून कंपनीच्या सुविधांचा तीन महिने मोफत लाभ घेता येणार आहे . सोबतच वेबसाइट डेव्हलपर्ससाठी विविध टिप्सही याठिकाणी देण्यात आल्या आहेत .त्यामुळे वेब डेव्हलपर्सच्या भविष्यातील समस्या कमी होतील , अशी आशा आहे .
ग्रुप चॅट तेही व्हिडिओवर करण्याची धम्माल आता जीमेलवर उपलब्ध होणार आहे . गुगलने नुकतेच आपल्या ग्रुप व्हिडीओ चॅटिंगची हँगआऊट सेवा भारतीय युजर्ससाठी लाँच केली .यामध्ये आपण एकाच वेळी नऊ जणांशी बोलू शकणारआहोत . ही सेवा वापरण्यासाठी युजर्सनी केवळ जीटॉकच्या पॅनेलशेजारी असलेल्या व्हिडीओ कॅमेरावर क्लिक करायचे आहे . यानंतर एक नवीन विंडो पॉप - अप होईल . यात गुगल प्लसमधील आपल्या मित्रांची यादी दिसणार आहे .यामध्ये आपण त्यांच्या जीमेल आयडीवर क्लिक करून त्यांना व्हिडीओ चॅटलिस्टमध्ये अॅड करू शकतो . गुगल प्लसमध्ये नसलेल्या एखाद्या मित्राशी आपल्याला चॅट करायचे असेल तर आपण जीमेल आयडीवरून त्यांना इन्व्हिटेशन पाठवू शकतो . हे चॅट आपण हँगआऊट या फिचरचा वापर करून सर्वांसाठी खुले करू शकतो . यासाठी युट्यूबचे अकाऊंट लागते . यानंतर ते चॅट ब्रॉडकास्ट होताना दिसेल . आपण त्या ग्रुपमध्ये करत असलेल्या विविध चर्चा आपल्या फोटोसह सर्वांना पाहवयास मिळणार आहेत . एकदा हँगआऊट सुरू झाले की , आपल्या ग्रुपमेंबर्सची यादी आपल्याला स्क्रीनच्या खालच्या बाजूस दिसते तर व्हिडीओ वरच्या बाजूस दिसतो . जीमेलच्या विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स , स्क्रीनशेअर , गुगल ड्राइव्ह , गुगल डॉक्स , इफेक्ट्स आणि पिंग पाँग हँगआऊट असे पर्याय दिसू लागतील . चॅट आणि हँगआऊटच्या माध्यमातून मित्रांना मेसेजेसही पाठवता येणार आहेत . तर स्क्रीनशेअर या सुविधेमध्ये मित्रांशी स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत . हे शेअर केल्यावर आपल्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सना तो व्हिडीओ पाहता येणार आहे . गुगल ड्राइव्ह आणि गुगल डॉक्स हे व्हिडीओ चॅट्समध्ये अधिक गंमत आणतील , असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे . हँगआऊटमध्ये जाऊन मज्जा - मस्ती करायची असेल तर गुगलने हँगआऊटमध्ये गेम्सचीही सुविधा दिली आहे .यामध्ये आपल्या ग्रुपमधील एखाद्याशी गेम्स खेळता येणार आहेत . याचबरोबर यामध्ये आपण विविध वॉलपेपर्स ,साऊंड इफेक्ट्स , फोटो आदी गोष्टी आणि आपल्या आवडीचे अॅप्सही वापरू शकणार आहोत . भविष्यात गुगलच्या सर्व सुविधा म्हणजे कॅलेंडर , ई - मेल यालाही हँगआऊट करता येणार आहे . म्हणजे एकाच वेळी आपण एखादी गोष्ट आपल्या विविध मित्रांशी शेअर करू शकतो . त्यामुळे आता मित्रांसोबत हँगआऊट करण्यासाठी जीमेलचा नवा पर्याय खुला झाला आहे .
सायबर कॅफेत जाण्याऐवजी मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक-युवती फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर यासारख्या सोशल वेबसाईटवर...
सोशल मीडियामध्ये युर्जसच्या फोटोवरून वादंग माजले आहे. फिल्टर्स आणि कॅमेरा अँप्सच्या मदतीने गेल्या वर्षभरात सोशल नेटवर्किंग वेबसाइट युर्जसना मोठे फोटो...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech