सरफेस आरटीवर एचडी चित्रपटांची मजा
मायक्रोसॉफ्टने आपला पहिला टु-सरफेस स्लेट लाँच केला आहे. यात टॅब्लेट विंडोज-8 आरटी आहे. हा सर्वोत्तम ठरेल किंवा ‘इंटेल आय 5-पॅकिंग...
मायक्रोसॉफ्टने आपला पहिला टु-सरफेस स्लेट लाँच केला आहे. यात टॅब्लेट विंडोज-8 आरटी आहे. हा सर्वोत्तम ठरेल किंवा ‘इंटेल आय 5-पॅकिंग...
ब्लॅकबेरी मोबाईल निर्माता कंपनी 'रिसर्च इन मोशन'चे (RIM) गुरुवारी दोन स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. ब्लॅकबेरी Z10 आणि ब्लॅकबेरी Q10 अशी...
माहिती आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते १६ खंड आता ई - बुक स्वरूपात उपलब्धझाले आहेत . नियोजन आयोगाचे सदस्य डॉ . नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नुकतेच सोळाव्या खंडाचे लोकार्पणकरण्यात आले . तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेले पहिले पंधरा खंड आणि प्रा . मे . पुं . रेगेयांनी संपादित केलेला सोळावा खंड असा हा लाखो पानांचा ऐतिहासिक दस्तावेज आता इंटरनेटच्या माध्यमातूनजगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे . चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमध्ये आयोजित या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ . जाधव यांनी आज घराघरात कम्प्युटर तसेच मोबाइलद्वारे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट पोहोचले असताना युनिकोडमधून विश्वकोश जसा आहे , तसा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची मराठी विश्वकोश मंडळाची संकल्पना अफाट असल्याचे सांगून विश्वकोश मंडळाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे ' सी - डॅक ' चे महेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचीही स्तुती केली . विश्वकोश मुलांनी वाचावा आणि इतरांनाही इंटरनेटवर तो वाचण्यास प्रवृत्त करावे , असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला . प्रयत्नवाद , आशावाद , उच्च ध्येय , नम्रता , आत्मविश्वास ,अपयशावर मात करण्याची जिद्द , प्रागतिक दृष्टिकोन , वेळेचे नियोजन आणि देशप्रेम ही यशाची नऊ सूत्रे असून त्यांची कास विद्यार्थ्यांनी कधी सोडू नये , असेही ते म्हणाले . तर ' विश्वकोश कोशात न राहता तो विश्वात यावा ,यासाठी ही सारी धडपड आहे ' असे विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ . विजया वाड यांनी सांगितले . ई - बुक आवृत्तीनंतर विश्वकोश आता टॅबलेटवरही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सी - डॅकचेसंचालक महेश कुलकर्णी यांनी सांगितले . विश्वकोशाचे सर्व खंड marathivishwakosh.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत .
एमएस ऑफिस आणि कम्प्युटर यांचे एक अनोखे नाते . परंतु मध्यंतरीच्या काळात ओपन ऑफिस आणि गुगल डॉक यांनी मायक्रोसॉफ्टला शह देण्याचा प्रयत्न केला . तो प्रयत्नतितकासा यशस्वी झाला नसला तरी मायक्रोसॉफ्टला या दोन्ही उत्पादनांतील सुविधांचा विचार करून एमएस ऑफिसमध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले . ऑफिस २०१०मध्ये पूर्वीपेक्षा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या .मात्र त्याही पलीकडे जाऊन काही सुधारणा आवश्यक होत्या म्हणून मायक्रोसॉफ्टने नुकतेच ऑफिस ३६५ लाँचकेले आहे . यामध्ये वर्ल्ड , एक्सेल , पॉवर पॉइंट , वन नोट , आऊटलूक , पब्लिशर अॅण्ड अॅक्सेस याचबरोबर २०जीबीपर्यंतचा स्कायड्राइव्ह स्टोअरेज मिळणार आहे . मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं हे व्हर्जन आपल्याला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून वापरू शकतो . याचावापर आपण एकावेळी पाच कम्प्युटर्स आणि पाच मोबाइल्समध्ये वापरू शकतो . आजपर्यंत ऑफिसची अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती . मायक्रोसॉफ्ट वेब अॅपच्या माध्यमातून आपण हे ऑफिस वापरू शकतो .याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही नवी मेल सुविधाही वापरता येणार आहे . तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन नोट या नवीन सुविधेचा वापरही या ऑफिसच्या माध्यमातून करता येईल . वन नोट म्हणजे आपण आपली कामे यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकतो . तसेच काही वाक्य जी आपण नेहमी आपल्या लिखाणात वापरत असतो ती वाक्यही सेव्ह करून ठेवता येतील . ऑफिसच्या या व्हर्जनची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्कायड्राइव्ह वापरायला मिळणार आहे . या स्कायड्राइव्हमध्ये आपल्याला २० जीबीपर्यंतचा डेटा स्टोअर करता येणार आहे . यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत . ते आपल्या ऑफिसच्या पॅकेजमध्येच मिळते . सध्या याचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत . यापुढे येणाऱ्या विंडोज८ च्या सर्व कम्प्युटर्सवर ऑफिस ३६५ इंस्टॉल अॅप्लिकेशन म्हणून असेल . ऑफिसच्या या व्हर्जनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी अॅप्स वापरता येणार आहे . यामध्ये पीडीएफ हे सर्वात उपयुक्त अॅप वापरता येईल . यामध्ये विंडोज७ प्रमाणेच आपण फाइल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो . याशिवाय लवकरच यामध्ये भारतीय युजर्सना उपयुक्त ठरतील असे रिड अॅण्ड राइटचे २०० अॅप्स येतील , असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे . यामध्ये ऑफिसहोम , स्टुडंट आणि प्रिमियम असे तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत .
सिंगल सिम मोबाईल फोनचा ट्रेंड हळूहळू कमी होतोय. कारण गॅझेटच्या दुनियेत ड्युअल सिम मोबाइलचा चांगलाच बोलबाला झाला आहे. मल्टीमीडिया, टच...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech