MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

जुन्या स्मार्टफोनचे ‘फर्स्ट क्लास’ पर्याय

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 28, 2014
in स्मार्टफोन्स
अनेकदा आपण फीचर्स आवडल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे एक स्मार्टफोन असताना नवीन स्मार्टफोन घेतो. अनेकजण तर हौस म्हणून महिन्याला स्मार्टफोन बदलत असतात. अशावेळी जुन्या स्मार्टफोनचं काय करावं? असा प्रश्न पडतो. अनेकदा हा फोन घरातच कुठे तरी पडून असतो किंवा काही शे रुपयांसाठी हा फोन आपण दुकानदारालाही विकतो. त्याऐवजी तुमचा हा ‘सेकण्ड’ स्मार्टफोन तुम्हाला काही ‘फर्स्ट क्लास’ पर्याय देऊ शकतो. त्यापैकीच हे टॉप १२ पर्याय…


​व्हिडीओ चॅट टर्मीनल


smobiव्हिडीओ चॅट टर्मीनल जर तुमच्या स्मार्टफोनला वायफायचा अॅक्सेस असेल, तर कॉल करण्याची खरंतर गरजच नाही; कारण तुम्ही यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन ‘व्हिडीओ चॅट टर्मीनल’ म्हणून वापरू शकता. या फोनवर ‘गूगल हॅगआऊट’ किंवा ‘स्काइप’सारखे अॅप्स इन्सटॉल करुन सरळ एखाद्याला व्हिडीओ कॉल करु शकता. तुम्ही ही कल्पना तुमच्या ऑफीसमध्येही वापरु शकता.


ई रीडर किंवा इतर भाषा शिकण्यासाठी 


जर तुम्हाला ‘ई बुक्स’ किंवा पीडीएफ जास्त वाचाव्या लागत असतील किंवा वाचायला आवडत असतील, तर तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनला ‘ई रीडर’ सारखं वापरु शकता. या फोनमध्ये ‘गूगल प्ले बुक्स’, ‘अॅमेझॉन किंडल’ सारख्या प्लॅटफॉर्मवरुन ‘ई बुक्स’ वाचू शकता. तसंच तुम्ही इतर भाषा शिकण्यासाठी तुमचा जुना फोन वापरु शकता. यामध्ये अगदी ‘की बोर्ड’ अॅप्ससारख्या अॅपमार्फत परदेशी भाषा टाइप करण्यापासून ती शिकण्यापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी ‘गूगल प्ले’वर किंवा ‘प्लेमार्केट’वर भाषांशी संबंध‌ित अॅप्स डाऊनलोड करू शकता.


डेक्सटॉप कॅलेण्डर 


तुमच्या ऑफीसमध्ये किंवा अगदी घरच्या कम्प्युटरडेस्कवरील जुन्या कॉलेण्डरऐवजी तुमचा जुना स्मार्टफोन डिज‌िटल डेक्सटॉप कॅलेण्डर म्हणून वापरु शकता. गूगलवरील ‘नेट‌िव्ह अॅण्ड्रॉइड कॅलेण्डर’ अॅप्लिकेशन हे बेस‌िक अॅप तुम्ही सुरुवातीला वापरु शकता. या डिज‌िटल कॅलेण्डरमध्ये तुम्ही नोट्स, वाढदिवस, मीटिंग आणि रिमाईंडर्स सेव्ह करुन ठेवू शकता.


वायरलेस राऊटर


स्मार्टफोनमधील हॉटस्पॉट फीचर वापरुन तुमचा जुना फोन पोर्टेबल राऊटर म्हणून वापरता येईल. जुन्या फोनमधील सीम कार्डवरुन थ्री जी डेटा प्लॅन वापरुन फोनचा चांगला वापर करता येईल. या फोनवरुन इतर डीव्हाइसला (लॅपटॉप, टॅबलेट आणि फोनला) नेट कनेक्ट‌िव्ह‌िटी देऊ शकता. यामुळे प्रत्येक डिव्हाइसला वेगळं सीम कार्ड आणि डेटा प्लॅन घेण्यापेक्षा एका डेटा प्लॅनवर तुम्ही अनेक डिव्हाइस वापरु शकता.


टीव्ही मीड‌िया प्लेयर 


तुमच्या स्मार्टफोनला टीव्ही आऊट (एमएचएल किंवा एचडीएमआय आऊट) असेल, तर तुम्ही हा फोन टीव्हीवरील प्लॅश बेस मीडिया प्लेअर म्हणून वापरु शकता. तुमच्या या फोनसाठी जास्त क्षमतेचं मेमरी कार्ड (३२ ते ६४ जीबी) वापरुन सिनेमे आणि गाणी त्यावर कॉपी करता येतील. त्यानंतर एमएचएल आणि एचडीएमआय केबल वापरुन तुम्ही तुमचा स्मार्टफोन आणि टीव्ही कनेक्ट करुन आपल्या आवडत्या मुव्हीज आणि गाण्यांचा आनंद घेऊ शकता. यावेळी फोन चार्ज‌िंगला लावल्यास जास्त चांगलं; कारण जास्त वेळ मीडिया आऊटपूट दिल्याने बॅटरी लवकर संपते. तसंच तुमचा फोन आणि टीव्ही डीएलएनए किंवा मीरकास्टला सपोर्ट असल्यास तुम्ही वायर कनेक्ट न करताही सिनेमे आणि गाणी पाहू शकता.


अॅप्लिकेशन टेस्टर


सध्या अॅन्ड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयओएस किंवा विंडोज कोणतीही ऑपरेट‌‌‌िंग सीस्टीम असली तरी एकंदरीतच सर्वच स्मार्टफोनवरील अॅप्लिकेशनची संख्या वाढत आहे. मात्र अनेकदा अॅप्लिकेशन इंस्टॉल करेपर्यंत ते अॅप्लिकेशन चांगलं की वाईट हे समजत नाही. या अडचणीवरील उपाय म्हणजे तुम्ही तुमचा स्मार्टफोन अॅप्लिकेशन टेस्टर म्हणून वापरू शकता. आधी जुन्या फोनवर अॅप्लिकेशन इन्स्टॉल करुन ते आवडल्यासच ते नव्या फोनमध्ये इन्स्टॉल करु शकता. तसंच तुमच्या जुन्या फोनवर तुम्ही कस्टम रॉम तपासून बघू शकता. कस्टम रॉममुळे तुम्हाला लेटेस्ट ऑपरेटिंग सीस्टीम टेस्ट करणं, तसंच गरजेचे नसणारे बोल्टवेअर आणि अॅनिमेशन इफेक्ट काढण्यासाठी वापरू शकता.


वायरलेस सेक्युरिटी कॅमेरा


आज असे अनेक अॅप्लिकेशन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, जे तुमच्या फोनला एखाद्या वायरलेस कॅमेऱ्याप्रमाणे वापरण्यास मदत करतात. अँड्रॉइडमध्ये आयपी वेबकॅम किंवा आयओएसवर आयव्हीजीलो स्मार्टकॅम हे अॅप्लिकेशन वापरुन तुम्ही मोबाईलवर व्हिडीओचे लाइव्ह स्ट्रीम‌िंग करू शकता, जे तुम्हाला कोणत्याही वेब ब्राऊझरवर किंवा स्मार्टफोनमधील कोणत्याही व्हिडीओ प्लेअरवर बघता येईल. ही अॅप्लिकेशन इंस्टॉल असणाऱ्या वायफाय कनेक्टेड स्मार्टफोनला चार्जर लावून तुम्ही हे शूटिंग करू शकता. तुम्ही क्वॉलिटी आऊटपूटसाठी अँड्रॉइड, आयओएस, विंडोज, ब्लॅकबेरी आणि सिंम्बीयन ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध असणा-या मोबोला वेबकॅमेरा अॅप हे पेड अॅप्लिकेशन वापरू शकता.


गेमींग डिव्हाइस


अनेकदा आपल्याला फोनवर प्रवासादरम्यान गेम्स खेळून चांगला टाइमपास होतो. मात्र रोजच्या वापरातल्या फोनवर अधिक गेम्स अॅप डाऊनलोड केल्यास फोन मेमरी भरते किंवा फोन स्लो होतो. तसंच एकाच प्रकारचे अनेक गेम्स असल्याने कोणता गेम डाऊनलोड करायचा हेच अनेकदा समजत नाही. म्हणून जुन्या फोनवर तुम्ही एकाच साच्यातले वेगवेगळे गेम्स खेळू शकता. त्यातल्या त्यात सर्वात जास्त आवडणारे गेम तुम्ही तुमच्या रोजच्या फोनवरही डाऊनलोड करु शकता.


जीपीएस नॅव्हीगेशन गूगल मॅप आणि नेव्ह‌िगेशन 


तुमच्या अॅन्ड्रॉइड फोनवर फुकट उपलब्ध आहे. तुम्ही हे गाडी चालवताना दिशादर्शक म्हणून वापरु शकता. याशिवाय तुम्हाला मॅम माय इंडिया हे अॅप्लिकेशन वापरु शकता. मॅप माय इंडियामधील लोकेशन, इमारती आणि रस्त्यांचे ग्राफ‌िक्स बरेच चांगले आहेत. म्हणजेच तुमच्याकडे जुना अॅण्ड्रॉइड फोन असल्यास तो तुम्ही गाडीमध्ये फिक्स करुन ठेवा, ज्यामुळे तुम्हाला गाडीसाठी वेगळा जीपीएस नेव्हीगेटर घेण्याची गरज नाही. तुमच्या गाडीमध्ये फक्त मोबाइल माऊट स्टॅण्ड आणि जेनेरिक मायक्रो युएसबी १२व्ही कार चार्जरने बॅटरी चार्ज करण्याची गरज आहे. या दोन्हीची किंमत एकत्र‌ितपणे ३०० किंवा त्याहून कमी आहे. तुम्ही कार डॅसबोर्ड अॅप्लिकेशन वापरु शकता. या अॅपमधील इंटरफेस सोपा असून मोठे आयकॉन्स, आणि व्हाइस कमांडचे पर्याय आहेत. तुम्ही या सर्वांचा एकत्रितपणे वापर करु शकता.


कम्प्युटर रिमोट 


जर तुमच्याकडे डेक्सटॉप किंवा टीव्हीला कनेक्टेड मायक्रो पीसी असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन तुमचा कम्प्युटर हाताळू शकता. सामान्यपणे वायरलेस की बोर्ड आणि माऊसशिवाय तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुन कंम्प्युटरवर नेट ब्राऊसिंग करु शकता. मोबाइल माऊस लाइट हे अॅप्लिकेशन आणि www.mobilemouse.com या साइटवरुन सर्व्हर सॉफ्टवेअर डाऊनलोड करणं गरजेचं आहे. स्मार्टफोन आणि पीसी दोन्ही एकाच वायफाय नेटवर्कवर कनेक्टेड असल्यास वरील सॉफ्टवेअरील टीप्स तुम्हाला दोन्ही डिव्हाइस सिक्रो करण्यास मदत करतील. मोबाइल माऊस अॅपमुळे कंम्प्युटरच्या माऊस, कीबोर्डऐवजी स्मार्टफोन वापरुन काम करु शकता. तसंच या रिमोटवरुन व्हिएलसीसारख्या प्लेअर, प्रेझन्टेशनसाठी वापरण्याच्या रिमोट म्हणूनही हा सिंक्रो केलेला स्मार्टफोन वापरु शकता. थोडक्यात म्हणजे तुम्ही काही फुटावर बसून हवेत स्मार्टफोन फिरवून त्याचा माऊससारखा वापर करू शकता. फोनवरुन फोटो किंवा इतर माहिती स्टोअर केल्यानंतर मेमरी कॅपॅस‌िटी संपली असेल, तर तुम्हाला तुमचा दुसरा स्मार्टफोन उपयोगी ठरु शकतो. तुम्ही सध्या उपयोगाची नसलेली माहिती दुस-या स्मार्टफोनच्या मेमरी कार्डवर ट्रान्सफर करु शकता.


एखाद्या अॅन्ड्रॉइड फोन डेटा बॅकअप डिव्हाइस म्हणून वापरायचा असेल, तर त्या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि युएसबी होस्ट कॅपेबल‌िटी असणं गरजेचं आहे. ३२ जीबीचं मेमरी कार्ड एक हजारापर्यंत मिळू शकतं, तर युएसबी कॉड शंभर रुपयांपासून उपलब्ध आहे. मेमरी कार्ड रिडरने फोनच्या मेमरी कार्डमधील डेटा आणि फोटो कंम्प्युटरवर ट्रान्सफर करू शकता. तसंच युएसबी फ्लॅश ड्राइव्ह मधूनही डेटा ट्रान्सफर करु शकता.


आपात्कालीन स्थिती बॅकअप फोन


कोणत्याही फोनवरुन सिमकार्ड नसतानाही तुम्ही इमर्जन्सी कॉल करु शकता. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना तुमचा जुना फोन पूर्णपणे चार्ज करुन बॅगमध्ये ठेवून द्यावा. अनपेक्षित घटना घडली, तर तुम्ही तुमचा हा बॅकअप फोन वापरु शकता. तसंच जुने अॅण्ड्रॉइड फोन विकून काही हजार घेण्यापेक्षा हे फोन घरी ठेवल्यास एखादा फोन हरवल्यास, हे फोन उपयोगी येऊ शकतात.

>> स्वप्निल घंगाळे

ADVERTISEMENT
Tags: DIYReUseSmartphonesTips
ShareTweetSend
Previous Post

अँड्रॉइडच्या समस्या

Next Post

बारावीचा निकाल आज

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
वनप्लसच्या डिस्प्लेवर ग्रीन-लाइन येणाऱ्या फोन्सना लाईफटाइम वॉरंटी!

वनप्लसच्या डिस्प्लेवर ग्रीन-लाइन येणाऱ्या फोन्सना लाईफटाइम वॉरंटी!

August 11, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
Nothing Phone 2

Nothing कंपनीचा Phone (2) सादर : नव्या Glyph इंटरफेससह!

July 12, 2023
Next Post

बारावीचा निकाल आज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!