MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

मायक्रोसॉफ्ट बनली आहे 1 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल असलेली कंपनी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 26, 2019
in News

मायक्रोसॉफ्टने 1 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवलाचा हा टप्पा काल काही क्षणांसाठी ओलांडला. हा टप्पा ओलांडणारी मायक्रोसॉफ्ट जगातली तिसरी कंपनी ठरली आहे! याआधी अॅपल व अॅमेझॉन यांनी हा मोठा पल्ला गाठला होता! ह्या क्षणी हा लेख लिहीत असताना मायक्रोसॉफ्ट जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली कंपनी आहे!

१ ट्रिलियन डॉलर्स रुपयांमध्ये सांगायचे तर ~६९ लाख कोटी रुपये भागभांडवल! अॅपल व अॅमेझॉनने हा टप्पा आधीच गाठलेला असला तरी त्यांचं सध्याचं मार्केट कॅपिटल खाली आलं आहे. हा लेख लिहीत असताना अॅपलचं 964 बिलियन डॉलर्स, अॅमेझॉनचं 946 बिलियन डॉलर्स तर मायक्रोसॉफ्टचं 994 बिलियन डॉलर्स इतकं मार्केट कॅपिटल आहे. मात्र हे काही दिवसातच अॅपल व अॅमेझॉनचं यांचे क्वार्टरली रिझल्ट्स जाहीर केल्यावर पुन्हा एकदा वर जाऊ शकतील!

ADVERTISEMENT

CNBC च्या गणितानुसार जर तुम्ही २००९ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये 1000 डॉलर्स गुंतवले असते तर त्याची किंमत आज 8000 डॉलर्स इतकी म्हणजे 700% अधिक झाली असती!

सध्याचे सीईओ सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टमधील सूत्रे स्विकारल्यापासून मायक्रोसॉफ्टने वेगाने भरारी घेतली आहे. नेहमीचं सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळख न राहता क्लाऊड कम्प्यूटिंगमध्येही ते सध्या आघाडीवर आहेत! येणार्‍या काळात वाढत जाणारी क्लाऊड कम्प्यूटिंगची गरज पाहता मायक्रोसॉफ्टने आधीच योग्य दिशेने पाऊल टाकलं आहे असं म्हटल्यास हरकत नाही. सर्फेस मालिकेतील हार्डवेअर प्रोडक्टससुद्धा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. अलीकडे मायक्रोसॉफ्टने नेहमीची क्षेत्र सोडून इतर ठिकाणीही बरीच गुंतवणूक केलेली पाहायला मिळत आहे. यासोबत आधीची मानसिकता बदलत आता इतर कंपन्यांसोबत काम करण्याची दाखवलेली तयारी त्यांना नक्कीच फायदेशीर ठरत असल्याच दिसून येत आहे!

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पॉल अॅलन

मायक्रोसॉफ्टची सुरुवात बिल गेट्स यांनी ४ एप्रिल १९७५ मध्ये केली होती. बिल गेट्स व मायक्रोसॉफ्टचा सुरुवातीचा प्रवास आमच्या या लेखामध्ये वाचू शकाल.

search terms : Microsoft third company to cross $1 trillion market cap US nasdaq after Apple and Amazon

Tags: MarketMarket CapitalMicrosoftNASDAQSatya Nadella
Share19TweetSend
Previous Post

गूगलवर ‘thanos’ सर्च करा आणि पहा गंमत!

Next Post

ES File Explorer प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : पुन्हा एकदा गैरप्रकार !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

February 8, 2023
MicrosoftRewardsIndia

मायक्रोसॉफ्ट रिवार्ड्स भारतात उपलब्ध : एज ब्राऊजर वापरा व बक्षिसे मिळवा!

August 22, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Satya Nadella Sundar Pichai

सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर!

January 25, 2022
Next Post
ES File Explorer प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : पुन्हा एकदा गैरप्रकार !

ES File Explorer प्ले स्टोअरवरून काढून टाकलं : पुन्हा एकदा गैरप्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!