MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home AI

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 8, 2025
in AI, टेलिकॉम
Jio Google Gemini Offer

रिलायन्स जियोने त्यांच्या ग्राहकांसाठी गूगलच्या Gemini AI Pro प्लॅनमधील सेवा चक्क १८ महिने मोफत देत असल्याचं सांगितलं आहे. याची किंमत ३५१०० इतकी असून आता तेच सर्व Jio 5G ग्राहकांना मोफत मिळणार आहे! यामध्ये 2TB स्टोरेज, Gmail सारख्या सेवांमध्ये Gemini AI वापरता येईल, Veo 3.1 (AI व्हिडिओ तयार करण्यासाठी) आणि Nano Banana या इमेज तयार करण्याची टूलमध्ये अधिक जास्त लिमिट्स मिळतील.

यासाठी तुम्हाला ऑफर Claim करावी लागेल आणि किमान दरमहा रु 349 किंवा त्याहून अधिक किंमतीचा Unlimited 5G प्लॅन रीचार्ज करावा लागेल. तरच ही ऑफर सुरू राहील. शिवाय हा प्लॅन वापरण्यापूर्वी काही गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याबद्दल पुढे नक्की वाचा.

ADVERTISEMENT

आधी Perplexity Pro + Airtel त्यानंतर गूगलनेच विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष मोफत Gemini आणलं मग ChatGPT Go प्लॅन भारतीय युजर्ससाठी फ्री करण्यात आला आणि आता गूगल Gemini + Jio ऑफर आली आहे. देशातील तरुण वर्गाला या AI टूल्सची सवय लावून भविष्यात यांना आपल्याकडे ग्राहक म्हणून घेण्यासाठी ही स्पर्धा जोरात सुरू झाली आहे.

जियो 5G ग्राहकांनी गूगल Gemini Pro ऑफर कशी Claim करायची ?

  1. MyJio ॲप उघडा आणि लॉगिन करा
  2. ॲप उघडल्यावर वरती Google Gemini ऑफरचा बॅनर दिसेल
  3. त्यावर क्लिक करा आणि Claim करा. तुम्हाला ज्या Gmail आयडीवर जोडायचं आहे त्याची माहिती द्या
  4. आता तुम्ही १८ महिने गूगल Gemini Pro AI मोफत वापरू शकता!

ही ऑफर गेले काही दिवस फक्त १८ ते २५ वयोगटातील ग्राहकांना (तरुणवर्गाला) उपलब्ध करून देण्यात आली होती. आता ८ नोव्हेंबरपासून सर्व वयोगटातील जियो ग्राहकांना ही ऑफर मिळेल. तुम्हाला MyJio मध्ये गेल्यावर Register Interest असं बटन दिसू शकतं त्याचा अर्थ तुमच्या अकाऊंटला अद्याप ही ऑफर आलेली नाही काही दिवसात येईल.

जियो 5G ग्राहकांनी ऑफर Claim करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • ही ऑफर वापरण्यासाठी तुम्हाला पूर्ण १८ महिने किमान ३४९ रु किंवा त्याहून जास्त किंमतीचा Unlimited 5G प्लॅनने रीचार्ज करत राहावं लागेल.
  • जर तुम्ही रीचार्ज केला नाही तर त्या ऑफरमधील सेवा वापरता येणार नाहीत.

  • तुम्ही कोणत्या गूगल अकाऊंटला ही ऑफर लिंक करायची ते काळजीपूर्वक निवडा
  • १८ महिने 2TB स्टोरेज मिळणार असलं तरी त्यासाठी १८ महिने पूर्ण झाल्यानंतर त्या प्लॅननुसार पैसे द्यावे लागतील. हे प्लॅन्स Google One वर पाहू शकता.
  • 2TB च्या प्लॅनची किंमत दरमहा ₹६५० इतकी आहे आणि 2TB+Gemini ची किंमत दरमहा ₹१९५० इतकी आहे.
  • तुम्ही जर तुम्हाला आधीच फ्री मिळणाऱ्या 15GB च्या वर डेटा स्टोअर केला आणि जर तुम्ही १८ महिन्यानंतर त्यांना पैसे देणार नाही असं ठरवलं तर तुम्हाला नवीन ईमेल मिळणार नाहीत किंवा पाठवतासुद्धा येणार नाहीत. तुम्हाला स्टोअर केलेला डेटा मध्ये नवीन काही अपलोड/एडिट करता येणार नाही.
  • त्यामुळे तुम्ही फक्त 2TB स्टोरेजसाठी ही ऑफर घेणार असाल तर तुमच्या Primary/मुख्य वापरातील ईमेल ॲड्रेसला शक्यतो ही ऑफर जोडू नका. नवीन ईमेल आयडी बनवून त्यावर Claim करा.
  • तुम्ही जर त्या 2TB डेटा स्टोरेजचा वापर करणार नसाल तर तुमच्या मुख्य ईमेल आयडीवरच ही ऑफर Claim केली तर चालेल.

  • तुमच्याकडे आधीच Google One चं सबस्क्रिप्शन असेल आणि तुम्ही ही ऑफर Claim केली तर ती आधीची ऑफर बंद होऊन त्या जागी हा नवा 2TB चा प्लॅन सुरू होईल.
  • १८ महिने झाल्यानंतर तुम्हाला किती GB चा प्लॅन वापरायचा आहे त्यानुसारच प्लॅन आणि अकाऊंट निवडा.

हे सर्व सांगण्याचं कारण की फ्री मिळणारी सेवा समोरून फ्री वाटत असली तरी शेवटी त्यांच्या उद्याच्या व्यावसायिक उद्देशानेच ह्या सोयी मोफत दिल्या आहेत. सुरुवातीला फ्री वापरण्यास देऊन त्याची सवय लावून मग नंतर भरमसाठ पैसे लावायचे आणि त्या सिस्टम्समध्ये अडकवून त्यांच्याच सेवा वापरण्यास भाग पाडायचं असं चित्र AI मधील किंवा एकंदर सर्वच टेक कंपन्या करताना दिसून येत आहे. म्हणून हे सबस्क्रिप्शन घेताना काळजीपूर्वक अकाऊंट निवडून त्यामागील छुप्या किंमती समजावून घेऊनच वापर सुरू करा…

Tags: AIGemini AIGoogleJioOffers
ShareTweetSend
Previous Post

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

Next Post

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
Next Post
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech