MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #4

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
November 12, 2018
in ॲप्स

उपयोगी अॅप्स मालिकेमध्ये हा चौथा भाग असून यामध्ये आपण UTS, स्केच बुक, वॉली, व गूगल लेन्स हे अॅप्स पाहणार आहोत. आम्ही दिलेल्या अॅप्सना तुमच्या विशिष्ट गरजेनुसार आणखी चांगले पर्याय सुद्धा उपलब्ध असू शकतात त्याचा सुद्धा आपण शोध घेऊ शकता. आपल्या प्रतिक्रियांसोबतच जर आपणास कोणते अॅप या लेखामध्ये सुचवायचे असेल तर आम्हाला अवश्य कळवा.

SketchBook – draw and paint : ऑटोडेस्कतर्फे उपलब्ध असणारे स्केच बुक अॅप कलाकारांसाठी पर्वणीच आहे. हे अॅप प्ले स्टोअर त्याचबरोबर डेस्कटॉपवर  काही दिवसांपूर्वी मोफत उपलब्ध झाले असून आपणास फक्त मोफत वापरण्यासाठी अकाउंट तयार करावे लागणार आहे. यामध्ये खूपसारे पर्याय जसे की क्विक कंट्रोल, विविध पेन/पेन्सिल ऑप्शन, कलर, टूल्स त्याचबरोबर जवळपास १९० ब्रश पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. मोबाइलद्वारे स्कॅन करून त्यामध्ये विविध कलर वापरण्याचे पर्याय सुद्धा यामध्ये आहे. विविध प्रकारात एक्स्पोर्ट करण्याची सुविधा असल्याकारणाने jpg, PDF अशा अनेक स्वरूपात फाईल सेव्ह करता येते.

ADVERTISEMENT

डाउनलोड लिंक – Android / Windows (PC & Laptop)

UTS Mobile Ticketing : लोकल किंवा रेल्वेच्या जनरल (अनारक्षित) तिकीट ने प्रवास करावा लागला तर प्लॅटफॉर्मवरील गर्दीमध्ये उभे राहून तिकीट काढण्यापेक्षा भारतीय रेल्वेतर्फे उपलब्ध असणाऱ्या UTS अॅपची नक्कीच मदत होते. यामध्ये प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. या अॅपद्वारे पेपरलेस आणि प्रिंट असे दोन पद्धतीचे तिकीट बुकिंग पर्याय उपलब्ध असुन जर आपण रेल्वे ट्रॅक तसेच स्टेशन पासून दूर असाल तर याचा वापर करू शकता परंतु ठराविक म्हणजेच जवळपास ५ किमी परिसरात असणे आवश्यक आहे. तिकीट चेकरला पाहून लगेच तिकीट काढता येऊ नये या उद्देशाने स्टेशनमध्ये असताना तसेच रेल्वे रुळाजवळ असाल तर पेपरलेस तिकीट काढता येत नाही. प्रिंट तिकीट हे आपण कुठूनही काढू शकता व रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असणाऱ्या मशीनमध्ये आपला मोबाइल नंबर व तिकीट कोड टाकून प्रिंट करू शकता. तिकीट प्रिंट करणे आवश्यक असून न केल्यास विना तिकीट प्रवास करत असल्याचे समजले जाईल.

डाउनलोड लिंक –  UTS Mobile Ticketing

Walli : जर आपणास चांगले वॉलपेपर हवे असतील तर वॉली अॅप एक चांगला पर्याय आहे. यामधील वॉलपेपर हे आर्टिस्टने तयार केलेले असून त्यांच्यातर्फेच अपलोड केले जातात. आपण सुद्धा आर्टिस्ट म्हणून यामध्ये सहभागी होऊन आपले फोटो अपलोड करू शकता . यामध्ये अनेक सारे पर्याय उपलब्ध असून नेहमीपेक्षा हटके वॉलपेपर पाहायला मिळतात.  मोफत डाउनलोड करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध असून आपण आपल्या अकाउंटवर आवडणारे सेव्ह सुद्धा करता येतात.

डाउनलोड लिंक – Walli – 4K, HD Wallpapers & Backgrounds

Google Lens : गूगल लेन्स अॅप आपणास कॅमेराच्या मदतीने समोर असणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळविण्यास मदत करते. जसे की आपण एखाद्या परिसराबद्दल गूगल लेन्स द्वारे माहिती मिळवू शकता त्यामध्ये नाव, रेटिंग, कामकाजाची वेळ इत्यादी, बुक पाहिल्यास त्याबद्दलची माहिती, एखादा वनस्पती/फुल/प्राणी पाहिल्यास गूगल लेन्सचा वापर करून त्यांच्याबद्दल माहिती मिळवता येते. दुसऱ्या भाषेतील शब्द ट्रान्सलेट करण्याची सोय त्याचबरोबर तुमच्या कॅलेंडरमध्ये इव्हेंट जोडणे वगैरे. हे अॅप गूगलतर्फे मोफत उपलब्ध आहे.

डाउनलोड लिंक – Google Lens

Tags: AppMitraAppsGoogle LensSketchbookUTS Mobile TicketingWalli
Share25TweetSend
Previous Post

अॅमेझॉनची ऑडिओबुक्स सेवा ‘ऑडिबल’ (Audible) आता भारतात!

Next Post

आयफोनवरील Gboard आता मराठीत : सोबत अनेक नव्या सोयी!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
आयफोनवरील Gboard आता मराठीत : सोबत अनेक नव्या सोयी!

आयफोनवरील Gboard आता मराठीत : सोबत अनेक नव्या सोयी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech