Tag: WhatsApp

बीबीएम- ब्लॅकबेरी मेसेजिंग अॅपल आणि अँड्रॉइडवरही!

                    आतापर्यंत ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टिम , बीबीएम यांसारख्या सुविधांचा अनुभव फक्त ब्लॅकबेरीधारकांनाच घेता येत होता . त्या जोरावर ब्लॅकबेरीने कित्येक वर्षे वर्चस्व गाजवले . पण आता अॅपल आणि अँड्रॉइड वापरणाऱ्यांनाही बीबीएमचा मोफत लाभ घेता येणार आहे . त्यामुळे व्हॉट्सअॅप किंवा आयमेसेज सारख्या सेवांचा वापर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . असे असले तरी या क्रॉस फंक्शनालिटीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे , हे मात्र निश्चित .                      ...

‘अॅप’ टू डेट व्हॉटसअॅप पर्याय

व्हॉटसअॅप नाही असे स्मार्टफोन युजर फारच कमी असतील . पण प्रत्येकाकडे व्हॉटसअॅप आहे ,मग आपल्याकडे त्यापेक्षा वेगळे काही तरी असले पाहिजे असे अनेकांना वाटते . व्हॉटसअॅपला पर्याय असलेले अनेक अॅप उपलब्ध आहेत . अशाच काही अॅप्सविषयी ...  वायबर अॅप वायबर अॅप हे व्हॉटसअप सारखेच आहे . यात आपल्याला एका कोडद्वारे रजिस्टर करता येतेआणि ते आपल्या फोनवर मेसेजद्वारे मिळते . फोनमधले कॉन्टॅक्ट्स स्वत : शोधून हे अॅपआपल्याला मित्र - परिवाराशी जोडते . हे अॅप तुमच्या फोनमधील अॅड्रेस बुकमधील अन्य कॉन्टॅक्ट्सआधीपासूनच वायबरवर जोडलेले आहेत का , ते तपासून पाहते . या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे , याअॅपद्वारे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून फोन करता येतो तोही फ्री . यात ३जी आणिवायफायमध्ये सर्वात उतम व्हॉइस क्वालिटीमध्ये कॉल करता येतो .  वुई - चॅट हे चीनमधील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे . यामध्ये रजिस्टर करण्याची प्रक्रिया ही व्हॉटसअॅपसारखीच आहे . कारण यातही प्रोसेस आपल्या मोबाइल नंबर एंटर करण्याची आहे . त्यानंतरएक फॉलोअप मेसेज मिळतो , ज्यात तुमचा व्हेरिफिकेशन कोड असतो . यामध्ये तुम्हाला तुमचेफेसबुक आणि इतर ईमेल अकाउंट्स कनेक्ट करून अधिक लोकांशी जोडणे सोपे होते . या अॅपचीअन्य आकर्षणे म्हणजे शेअरिंग पिक्चर्स , काँटॅक्ट्स , युजरचे करेक्ट लोकशन आणि व्हिडिओ चॅट.  चॅट - ऑन चॅट - ऑन हे सॅमसंग कंपनीने तयार केलेले अॅप आहे . हे अॅप एक बेसिक मेसेजिंग अॅप मानलेजाते . यात कॉलिंग फीचर्स उपलब्ध नाहीत . हे अॅप सॅमसंगचे असले , तरी हे सगळ्या मोबाइलप्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे . या अॅपच्या नोंदणीसाठी सॅमसंग अकाउंटचा वापर करता येतो किंवाही प्रक्रिया वगळून डायरेक्ट नाव आणि नंबर रजिस्टरकरून हे अॅप वापरता येते . हे अॅप तुमच्याफोनमधले ऑनबोर्ड काँटक्ट्स स्वतः चेक करून या अॅपचे इतर यूजर्स शोधते . या अॅपद्वारेआपल्याला फक्त चॅट - ऑन यूजर्सशी चॅट करता येते .  किक मेसेंजर किक मेसेंजरमध्ये आपल्याला आपल्या ई - मेल आयडीद्वारे रजिस्टर करून एक युनिक यूजरनेमनिवडता येते . या अॅपमध्ये यूजर आयडीने इतर लोक आपल्याला शोधू शकतात . हे अॅप ईझी टूयूज आहे आणि ऑन टाइम मेसेज पण पाठवते . या अॅपमध्येही कॉलिंग फीचर्स उपलब्ध नाहीत .पण हे अॅप विविध मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर वापरता येते .  लाइव्ह प्रोफाइल लाइव्ह प्रोफाइल हे अॅप ईमेल अकाउंटद्वारे रजिस्टर करता येते . तुमचा फोन नंबर या अॅपमध्येदाखल केल्याने दुसऱ्या यूजर्सना तुम्हाला शोधता येते . प्रत्येक अकाउंटला एक लाइव्ह प्रोफाइल पीनदिला जातो , जो आपल्याला आपल्या मित्रांशी शेअर करता येतो . या अॅपमध्ये तुम्हाला कॉलिंगफीचर्स उपलब्ध नाहीत . पण मेसेजिंगद्वारे पिक्चर्स , व्हिडिओस शेअर करून किंवा ग्रुप चॅटनेसंवाद साधता येतो .  स्काइप स्काइपमध्ये तुमच्या माइक्रोसॉफ्ट अकाउंटमधून साइन इन करून तुमचा मेसेंजर मिळवता येतो ,ज्यात हॉटमेल आणि आउटलुकच्या काँटॅक्ट्सना एकत्र आणता येते . या अॅपद्वारे तुम्हाला तुमच्याखूप जुन्या फ्रेण्ड्ससोबत कनेक्टेड राहता येते . स्काइप हे अस अॅप आहे , ज्यात आपल्याला फ्रीकॉल व टेक्स्ट मेसेज करता येतात , पण फक्त स्काइप यूजर्ससोबत . परंतु तुम्हाला हव्याअसलेल्या युजर्सना अप्रुव्ह करून तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता येतो . हे अॅप त्याच्यारिलायेबिलिटी आणि स्टेबिलिटीसाठी प्रसिद्ध आहे .  काको टॉक मेसेंजर हे अॅप तुमचा फोन नंबर डिटेक्ट करून तुम्हाला मेसेजद्वारे ४ डिजिट व्हेरिफिकशन कोड मेसेजपाठवते . ही प्रोसेस संपल्यावर ते आपल्या काँटॅक्ट्समधील युजर्सना शोधते . या अॅपमध्ये तुम्हालापिक्चर्स , ऑडियो नोट्स , कॅलंडर आणि काँटॅक्ट इन्फर्मेशन शेअर करता येते . या अॅपचे वैशिष्ट्यम्हणजे , याद्वारे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून फ्री कॉलही करता येतो . हे वायबार अॅपसारखेचआहे .  फेसबुक मेसेंजर हे अॅप तुम्हाला तुमच्या फ्रेंडसशी चॅट करण्यात मदत करते . या अॅपचे इंटरफेस चांगले आहे . पण हे अॅप अतिशय स्लो आहे . यामधून तुम्हाला केवळ तुमच्या फेसबुक फ्रेंडशीच चॅट करता येऊ शकते. यामुळे हे वॉटस अॅपसाठी पर्याय न ठरता ते त्याच्यासोबत वापरता येणारे एक अॅप असू शकते .  लाइन अॅप लाइन अॅप तुमचा फोन नंबर त्याच्या डेटाबेसशी जोडते , ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फोन काँटॅक्ट्समधील लाइन यूजर्सशी सहज संवाद साधता येतो . या अॅपमध्ये रजिस्ट्रिंग प्रोसेस वायबरसारखीच आहे आणि या अॅपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पीसी किव्हा मॅक - ओएस द्वारेही रिप्लाय करता येतो . मेसेजिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाइन यूजर्सशी इंटरनेटचा वापर करून फ्रीफोन करता येतो .  ग्रूप - मी ग्रूप - मी हे नाव ऐकून तुम्हाला कळलच असेल की हे अॅप ग्रूप चॅटसाठी खूप उपयुक्त आहे . हे अॅप व्हॉटसअपसारखे आहे , ज्यात आपल्याला एका कोडद्वारे रजिस्टर करता येते आणि ते आपल्या फोनवर मेसेजद्वारे मिळते . या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे , तुम्हाला ग्रुप चॅट मेसेजिंगद्वारेही संवाद साधता येतो . म्हणजेच तुमच्या मित्रांमधील कोणाकडे ३जी कनेक्शन नसेल ,तरीही त्याला या ग्रुप चॅटमधील मेसेज मिळतील आणि तेही फक्त काही ठराविक फी मोबाइल ऑपरेटरला देऊन. अमेरिकेतील व्यक्तींना मेसेज पाठवण्यासाठी प्रत्येक मेसेजसाठी पैसे आकारले जातात . >> पराग मयेकर 

व्हॉट अॅन अॅप!

इन्स्टन्ट मेसेज सेवेने गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वांच्या मोबाइलमध्ये स्थान मिळवलं आहे . यामुळे मूळच्या एसएमएस सेवेला मोठा धक्का बसला आहे . सुरुवातीला ही इन्स्टन्ट मेसेजिंग सेवा काही मर्यादित फोन्सवर उपलब्ध होती . मात्र , कालांतराने मोबाइलचे अवतार बदलत गेले आणि नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आल्या . यामुळे विविध अॅप्स बाजारात आले . यात व्हॉटस्अॅप हे सर्वांच्या पसंतीचे ठरले आहे .  भारतातील ५२ टक्के स्मार्टफोन युजर्स व्हॉटस्अॅपचा वापर करतात तर उर्वरित लोक फेसबुक मेसेंजर सेवेचा वापर करत आहेत . फेसबुकने आपलं अँण्ड्रॉईड मेसेंजर बाजारात आणलं आहे . पण त्यात सध्या फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांशीच आपण बोलू शकतो . हा मेसेंजर बाजारात आल्यावर तो व्हॉटस्अॅपला टक्कर देईल , अशी भाकीते रंगवली गेली होती . पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही . थिंक डीजिट या साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणातही बाब समोर आली आहे . यामध्ये सध्याचे भारतातील स्मार्टफोन युजर्स कोणते मेसेंजर वापरतात आणि त्यांचे त्यावरचे म्हणणे काय आहे याचा पूर्ण विचार करण्यात आला आहे .  या सर्वेक्षणानुसार भारतातील स्मार्टफोन युजर्सपैकी २५ टक्के युजर्स कोणत्याही प्रकारची मेसेजिंग सेवा वापरातनाहीत . ५२ टक्के लोक व्हॉटस्अॅप वापरतात तर , १४ टक्के लोक फेसबुक मेसेंजर वापरतात . ९ टक्के लोक फेसबुक मेसेंजर अँड्रॉईड व्यतिरिक्त इतर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वापरता येईल याची वाट पाहत आहेत . फेसबुक मेसेंजरमधील मर्यादा आणि इतर बाबी लक्षात घेता त्याचा वापर करणे फारसे कोणाला पसंत नसल्याचे या सर्वेक्षणातसमोर आले आहे . फेसबुकने मेसेंजर सेवा बाजारात आणून सध्याच्या प्रस्थापितांना दणाणून मात्र सोडलं आहे .पुढच्या काळात जर ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे सुरू करण्यात आली आणि त्यातील सर्व मर्यादा काढून टाकण्यात आल्या तर सध्याच्या सेवांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत . व्हॉटस्अॅपमध्ये आपल्या फोनबुकमधील लोकांशी संपर्क साधता येतो . मात्र , फेसबुक मेसेंजरमध्ये भविष्यात आपल्याला फेसबुकफ्रेंड्सबरोबरच फोनबुकमधील लोकांशीही संपर्क साधता येणार आहे . याचदरम्यान फेसबुक व्हॉटस्अॅपला विकत घेणार अशा अफवाही सुरू झाल्या आहेत . 

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

जगातील सर्वांत मोठे सर्च इं​जिन असलेल्या गुगलने देशभरातील युझर्ससाठी मोफत एसएमएस सेवा सुरू केली आहे . गेल्या मार्चपासूनच सुरू झालेली निवडक ग्राहकांपुरती ही सेवा गुगलने आता सर्वांसाठी खुली केली आहे . यासेवेद्वारे जीमेल चॅटच्या माध्यमातून मोबाइल फोनवर एसएमएस पाठवता येईल . या एसएमएसला फोनवरून रिप्लाय करता येईल. स्पॅम रोखण्यासाठी गुगलने प्रत्येक ग्राहकाला ५० एसएमएसचे क्रेडिट दिले आहे . वॉट्स अप ,निंबूझ यासारख्या मेसेज सेवांनी मोबाइलवर यापूर्वीच अधिराज्य निर्माण केल्याने गुगलचे हे पाऊल काहीसे उशीराच पडल्याचे मानले जाते . सध्या मोफत एसएमएस सुविधा देणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत . आता जीमेलनेही भारतात ही सोय उपलब्ध केली आहे . यापूर्वी आफ्रिका , उत्तर अमेरिका आणि आशियातील ५१ देशांमध्ये ही सुविधा सुरू होती . सर्वप्रथम२०११मध्ये आफ्रिकेतून या सुविधेची सुरुवात जीमेलने केली . भारतात प्रवेश करायला मात्र त्यांनी उशीर केला ,असंच म्हणावं लागेल . कारण याहूमेल आणि इंडियाटाइम्स यांसारख्या वेबसाइट्सवर एसएमएस सुविधाया आधीच उपलब्ध करून देण्यात आली होती . जीमेलची ही एसएमएस सुविधा मोफत उपलब्ध आहे . याआधारे जीमेलधारक मोबाइलवर जीमेल चॅटमार्फत एसएमएस पाठवू शकतात . या एसएमएसला आलेला रिप्लायही चॅटमध्ये दिसू शकेल आणि हे संभाषण चॅट हिस्टरीमध्ये सेव्ह केले जाईल . १० ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध झाली असून गुगल अॅप्सवरही ती उपलब्ध आहे . सध्या एअरसेल , आयडीया , लूप , एमटीएस , रिलायन्स , टाटा डोकोमो , व्होडाफोन यांसारख्या ऑपरेटरच्या मोबाइलवर हे मोफत एसएमएस पाठवता येतात . मात्र देशातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या एअरटेल आणि बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही .यापूर्वी मार्च महिन्यात केवळ काही मोजक्या ऑपरेटरसह ही सुविधा गुगलने सुरू केली होती . कसा करायचा एसएमएस ? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जीमेल काँटॅक्टमधील व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यावर ' ऑप्शन्स ' असा पर्याय येईल . त्यात ' सेंड एसएमएस ' पर्यायावर क्लिक केल्यास मोबाइल नंबर नमूद करण्याचा पर्याय येईल .त्याठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर अॅड केल्यास तुम्हाला त्या व्यक्तीच्या मोबाइलवर तुमच्या चॅटवरून थेट एसएमएस पाठ ‍ वता येईल . सुरुवातीला या सेवेमध्ये ५० मोफत एसएमएसचे ' क्रेडिट ' मिळणार असून प्रत्येक पाठविलेल्या एसएमएसबरोबर ते कमी होणार आहे . त्याचवेळी त्याला मिळालेल्या प्रत्येक रिप्लायनुसार पाच क्रेडिट वाढणार आहेत . मात्र ही मर्यादाही ५०ची असणार आहे . क्रेडिट शून्य झाले तर २४ तासानंतर तुमच्या खात्यात क्रेडिट जमा होईल . जीमेलवरून ही सुविधा मोफत असली , तरी तिला रिप्लाय करण्यासाठी केलेल्या एसएमएसला ऑपरेटरनुसार शुल्क लागू शकते . कोणत्याही जीमेल चॅटवरून एसएमएस नको असल्यास + ९१८०८२८०१०६० या क्रमांकावर STOP असाएमएसएम पाठवावा लागेल तर पुन्हा सुरू करण्यासाठी त्याच क्रमांकावर START असा एसएमएस पाठवावालागेल . जीमेलवर टाइप करा मराठीत जीमेलने आता मराठीसह इतर भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये थेट टायपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करूनदिली आहे . यापूर्वी गुगल ट्रान्सलिटरॉनच्या सहाय्याने ही सुविधा उपलब्ध होती . तुमच्या मेलमध्ये ही सुविधाअॅक्टिवेट करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन जनरल ऑप्शन्समधून लँग्वेज या पर्यायातून show all language options वर क्लिक करा . त्यात येणाऱ्या उपपर्यांयांमधून enable input tools वर क्लिक केल्यास तुम्हाला मराठी ,हिंदी , उर्दू , कन्नड , तेलगू , संस्कृत , अरेबिक , जर्मन यासारख्या जवळपास सर्व भारतीय आणि परकीय भाषांचापर्याय दिसेल . त्यातून तुम्हाला हव्या असलेल्या भाषा निवडा आणि सेटिंग्जमधील बदल सेव्ह करा . तुमच्याजीमेल होमपेजच्या हेडर बार तुम्हाला मराठीसाठी ' म ' हिंदीसाठी ' अ ' असे भाषानिहाय पर्याय दिसतील .तुम्हाला ज्या भाषेत टाइप करायचे असेल त्यावर क्लिक करा आणि ट्रान्सलिटरॉनच्या पद्धतीमध्ये ( उदा . ' मला 'साठी mala ) टाइप करा की झाला तुमचा मराठीतील इमेल तयार . यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या फॉन्टची, विशेष सॉफ्टवेअरची गरज नाही .

Page 13 of 13 1 12 13
ADVERTISEMENT
error: Content is protected!