MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

स्मार्टफोन पीसी दोन्हीवर उपलब्ध अॅप्लिकेशन्स

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 18, 2012
in सॉफ्टवेअर्स, ॲप्स

हल्ली २४ तास जगाशी संपर्कात रहायचं असेल तर ते अजिबात कठीण नाही. घरी नसताना तुमच्या स्मार्ट फोनने तुम्हाला सगळ्यांशी कनेक्टेड राहता येतं. आणि घरी असाल तर पीसीवरही अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेतच. स्मार्ट फोन आणि पीसीवर उपलब्ध असलेल्या काही अॅप्लिकेशन्सची माहिती. 
ऑपेरा वेब ब्राऊजर आणि गूगल क्रोम 

याआधी फक्त पीसीवरच उपलब्ध असलेले हे ब्राऊजर्स आता स्मार्टफोन्समध्येही उपलब्ध आहेत. पीसीवर गूगल क्रोममुळे काही अॅप्लिकेशन्स मोबाइल आणि पीसी अशा दोन्हीवर वापरता येतात. 

मेसेंजर मोबाइल आणि पीसीसाठी 

स्काइप मेसेंजरने तुम्ही कोणत्याही स्काइप आयडीशी व्हिडिओ कॉलिंग करू शकता. आधी हे अॅप्लिकेशन पीसीपुरतं मर्यादित असलं तरी आता ते जवळपास सगळ्याच स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहे. 

याहू मेसेंजर 

याहू मेसेंजरदेखील पीसीची मर्यादा ओलांडून आता स्मार्टफोन्समध्येही उपलब्ध आहे. 

एमएसएन मेसेंजर 

याहू आणि स्काइप यांच्याबरोबरच एमएसएनचा मेसेंजरही स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध आहे. 

अॅप्स , अँड्रॉइड मोबाइलवर आणि गूगल क्रोममध्येही 

एनी डू 

आपल्याला सगळीच महत्वाची कामं अथवा वाढदिवस आणि लग्न यांच्या तारखा लिहून ठेवायची सवय आहे. पण हल्लीच्या डिजिटल युगात लिहून ठेवलेल्या गोष्टी मिळत नाहीत आणि मग आयत्या वेळी पंचाईत होते. यावर उपाय म्हणून एक एनी डू नावाचं अॅप्लिकेशन आहे जे मोबाइल आणि पीसी दोन्हीमध्ये उपलब्ध आहे 

इन्स्टाग्राम फॉर क्रोम 

इन्स्टाग्राम या फोटो अॅप्लिकेशनची ओळख करून द्यायची आता गरज नाही. कारण आता जवळपास प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हे अॅप्लिकेशन आहे. पण आता हेच अॅप्लिकेशन तुमच्या पीसीवर गूगल क्रोममध्ये असेल तर त्यामध्येही उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचं अकाऊंट तयार करून अथवा असलेल्या अकाऊंटने लॉगिन करून हे वापरू शकता. 

फेसबुक मेसेंजर 

फेसबुक मेसेंजर अर्थात फेसबुकवर लॉगिन असलेल्यांशी गप्पा मारायचा हा एक पर्याय. आता हाच मेसेंजर गूगल क्रोममध्येही उपलब्ध आहे. यामुळे जर फक्त गप्पा मारायच्या असतील तर फेसबुक लॉगिन करायची गरज नाही. फक्त मेसेंजरवर लॉगिन केलं की झालं. 

इएसपीएन क्रिकइन्फो 

क्रिकेट मॅच चालू आहे आणि तुम्ही बाहेर आहात किंवा टीव्हीवर मॅच बघता येत नसेल तर अतिशय उपयुक्त असं हे अॅप्लिकेशन आहे. ज्यामुळे तुम्हाला नेहमी अपडेटेड माहिती मिळत राहते. 

ट्विटडेक 

एकाच वेळी फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट वापरण्यासाठी आणि अपडेट मिळवण्यासाठी हे एक चांगलं अॅप्लिकेशन आहे. तसंच फेसबुक आणि ट्विटरवरची माहिती शेअरही करता येते. दोन्हीमध्ये अकाऊंट असणाऱ्यांसाठी हे एक उपयुक्त अॅप्लिकेशन आहे आणि हे गूगल क्रोममध्ये उपलब्ध आहे. 

आयएमओ मेसेंजर 

जरी याहू , स्काइप आणि एमएसएन यांचे मेसेंजर स्मार्टफोननमध्ये उपलब्ध असलं तरी प्रत्येक मेसेंजर वेगळा डाऊनलोड करावा लागतो. हीच कमी पूर्ण करणारा आयएमओ मेसेंजर आहे. ज्यामध्ये तुम्ही एकाच वेळी तुमच्या सगळ्या चॅट अकाऊंटसवर लॉगिन करू शकता आणि तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्कात राहू शकता.

Evernote  हे नोट्स अप्प्लीकॅतीप्न सुद्धा प्रत्येक Device  वर वापरता येते 

अनुपम भाटवडेकर 

ADVERTISEMENT

Tags: any.doAppsCricinfoESPNEvernoteFacebookICQIMOMessengerMSNSkypeSoftwaresTweetdeckYahoo
ShareTweetSend
Previous Post

फेसबुक बदलतंय…

Next Post

आठव्या खिडकीत डोकावताना विंडोज ८ नाविन्य

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Lensa AI

तुमच्या फोटोंद्वारे बनवा भन्नाट डिजिटल चित्रं : Lensa AI ची कमाल!

December 11, 2022
Google Play 2022 Best Apps Games

गूगल प्लेवर २०२२ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 9, 2022
स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

December 2, 2022
इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

November 26, 2022
Next Post

आठव्या खिडकीत डोकावताना विंडोज ८ नाविन्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!